August 12, 2024 1:02 PM

views 42

नागपूर नवभारत प्रसारमाध्यम समूहाचे अध्यक्ष विनोद माहेश्वरी यांचं निधन

नागपूरच्या नवभारत प्रसारमाध्यम समूहाचे अध्यक्ष विनोद माहेश्वरी यांचं आज मुंबईत निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. डेंगू वरच्या उपचारांसाठी ते मुंबईच्या रुग्णालयात दाखल झाले होते. माहेश्वरी यांच्या निधनाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. समाजमध्यमावर गडकरी यांनी माहेश्वरी यांना आदरांजली वाहिली आहे.