September 6, 2024 7:59 PM

views 40

कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

आगामी हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि दीपक बवरिया यावेळी उपस्थित होते. काँग्रेस पक्षाची भूमिका महिलांसोबत उभं राहण्याची आणि कठीण काळात त्यांना साथ देण्याची असल्यानं पक्षात प्रवेश करत असल्याचं विनेश फोगाट हिनं यावेळी बोलताना सांगितलं.

August 17, 2024 2:46 PM

views 98

भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटचे दिल्ली विमानतळावर जोरदार स्वागत

भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर आणि याविरोधात केलेली याचिका फेटाळण्यात आल्यानंतर आज सकाळी दिल्ली विमानतळावर उतरली. तिच्या चाहत्यांनी तिचं जोरदार स्वागत केलं. विनेशचे कुटुंबीयही यावेळी उपस्थित होते. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० किलो वजनी गटात सुवर्णपदकाच्या सामन्याआधी विनेशचं वजन १०० ग्रॅम जास्त भरल्यानं तिला स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आलं होतं. याविरोधात तिनं क्रीडा न्यायालयात दाद मागितली होती आणि संयुक्तरीत्या रौप्यपदक देण्याची मागणी केली होती. तिची, ही याचिका फेटाळ...

August 11, 2024 9:58 AM

views 79

कुस्तीपटू विनेश फोगटच्या अपात्रतेविरुद्धच्या याचिकेवर १३ ऑगस्टला निर्णय

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये, क्रीडा लवादाने भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटच्या अपात्रतेविरुद्धच्या याचिकेवरील निर्णय येत्या मंगळवारपर्यंत पुढे ढकलला आहे. एकसदस्यीय लवाद, डॉ. ॲनाबेले बेनेट, यांना निकाल देण्यासाठी मंगळवारी भारतीय वेळेनुसार रात्री साडेनऊ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. विनेश फोगटने लवादाकडे केलेल्या अर्जात संयुक्त रौप्य पदकाची विनंती केली आहे. 50 किलोग्रॅम प्रकारात उपांत्य फेरीत जिंकल्यानंतर विनेशचं वजन 100 ग्रॅमने जास्त असल्याचं आढळून आलं होतं.

August 8, 2024 12:44 PM

views 113

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटने केली निवृत्तीची घोषणा

पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर भारतीय महिला पैलवान विनेश फोगाट हिनं आज आपल्या निवृत्तीची घोषणा केली. समाजमाध्यमावर पोस्ट करत आपण सर्व चाहत्यांच्या आणि देशवासियांच्या कायम ऋणात राहू असं विनेशनं म्हटलं आहे. दरम्यान, या निर्णयाविरोधात तिने क्रीडा लवादाकडे अपिल केलं असून आपल्याला संयुक्तपणे रौप्य पदक देण्याची मागणी केली आहे.

August 7, 2024 8:27 PM

views 92

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून विनेश फोगाट यांच्या कामगिरीचं कौतुक

विनेश फोगाटनं आत्तापर्यंत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये केलेल्या कामगिरीचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कौतुक केलं आहे. देशाला तिचा अभिमान असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं. तिला अपात्र ठरवल्यामुळे संपूर्ण देश निराश आहे, पण तरीही सर्व देशवासीयांसाठी ती चॅम्पियन असल्याचं मूर्मू यांनी नमूद केलं.   विनेश फोगाटला अपात्र ठरवण्याच्या निर्णयाबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनीही निराशा व्यक्त केली. यामुळे कोट्यवधी भारतीयांना धक्का बसल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये नमूद केलं.

August 7, 2024 8:06 PM

views 37

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ : पैलवान Vinesh Phogat हिला लिहिलेलं हे पत्र…

प्रिय विनेश...   ऑलिम्पिकचं पदक तुझ्या गळ्यात विसावलं असतं, तर ते पदक सुंदर झालं असतं. तू पदक गमावलेलं नाहीस विनेश, पदकाने तुला गमावलंय... काही ग्रॅम वजन जास्त भरलं म्हणून भले तुला स्पर्धेतून अपात्र ठरवलं असेल त्यांनी, पण कालच्या दिवसभरात तू दिलेला आनंद, अभिमान पदकापेक्षा कमी आहे का गं? आमच्यासाठी, संपूर्ण देशासाठी तू स्वतःच अस्सल सोनं आहेस, होतीस आणि राहशील. कुठल्या पदकाची गरजच नाही त्यासाठी.    पॅरिस ऑलिम्पिकच्या मैदानात कालच्या दिवशी तू केलेली जादुई कामगिरी अजूनही डोळ्यांत, मनात तश्...