June 19, 2024 3:50 PM

views 56

नारायण राणे यांनी भ्रष्ट मार्गाने विजय मिळवला – विनायक राऊत

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करत विजय मिळवला आहे, असा आरोप करत त्यांची निवड रद्द करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नोटीशीद्वारे केली आहे. राणे यांना पाच वर्षांसाठी निवडणूक लढवायला आणि मतदान करायला बंदी घालावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.