October 2, 2025 6:36 PM

views 73

दीक्षाभूमीपासून सुरू झालेल्या संविधान सत्याग्रह पदयात्रेची सेवाग्राममध्ये सांगता

दीक्षाभूमीपासून सुरू झालेल्या संविधान सत्याग्रह पदयात्रेची आज सेवाग्राममध्ये सांगता झाली. हा देश सर्वांचा आहे, शोषित, पीडित, मागास समाजाचा आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणारे संविधान आहे म्हणून संविधानाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे, असं काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले. या यात्रेनिमित्त संघाच्या मुख्यालयाला संविधानाची प्रत भेट देऊ इच्छिणाऱ्या युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांनी अटक केली.

September 10, 2025 3:47 PM

views 50

महायुती सरकारला राज्यातला शेतकऱ्यांची पर्वा नाही- विजय वडेट्टीवार

राज्यातला शेतकरी अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाला असून निराशेच्या भरात आत्महत्या करत आहे. परंतु महायुती सरकारला त्याच्याशी काहीही देणंघेणं नाही, अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी समाजमाध्यमाद्वारे केली आहे.    महायुती सरकारनं सत्तेत येण्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज माफीचं आश्वासन दिलं होतं, मात्र या आश्वासनाची पूर्तता न झाल्यानं गेल्या आठ महिन्यांत १ हजार १८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवन संपवल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

April 28, 2025 3:08 PM

views 56

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार दहशतवाद्यांना संरक्षण द्यायचा प्रयत्न करत आहेत – चंद्रशेखर बावनकुळे

दहशतवाद्यांना जात धर्म नसतो असं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार दहशतवाद्यांना संरक्षण द्यायचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी  केला आहे. ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. वडेट्टीवार यांचं वक्तव्य बेजबाबदारपणाचं आहे, असंही बावनकुळे म्हणाले.    पहलगाम इथं हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा हेतू देशातल्या नागरिकांमधे फूट पाडणं असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टमधे म्हटलं आहे. भारताच्या एकात्मतेसाठी आणि अखंडतेसाठी देशविघातक प्रवृत्तींना मोडून काढ...

March 24, 2025 3:41 PM

views 63

विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी

अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस उरले असल्याने, संख्याबळ न पाहता विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.   विधानसभेचे कामकाज एकतर्फी होऊ नये. या करता अशी नेमणूक करण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे त्यामुळे त्यांनी निर्णय घ्यावा, असं वडेट्टीवार म्हणाले.  सभागृहाचं कामकाज नियमानुसार चालणार तसंच नियमानुसार नियुक्त्या करण्यात येतील असं आश्वासन अध्यक्षांनी यावेळी दिलं.  

September 21, 2024 3:34 PM

views 56

आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची-पालकांची आर्थिक लूट करण्याचा महायुतीचा डाव – विजय वडेट्टीवार

राज्यातल्या खासगी विनाअनुदानित आयुर्वेद, होमिओपॅथी तसंच युनानी पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात संस्थात्मक कोट्यातून पट्टीवार म्हणाले.  सभागृहाचं कामकाज नियमानुसार चालणार तसंच नियमानुसार नियुक्त्या करण्यात येतील असं आश्वासन अध्यक्षांनी यावेळी दिलं.