November 2, 2025 5:08 PM

views 70

व्हिएतनाममध्ये पुरामुळे ३५ जणांचा मृत्यू, ६० जण जखमी

व्हिएतनाममध्ये विक्रमी पाऊस आणि अचानक आलेल्या पुरामुळे ३५ जणांचा मृत्यू झाला, तर ६० जण जखमी झाले. पाच जण अद्याप बेपत्ता आहेत. १६ हजार ५०० पेक्षा जास्त घरं अजूनही पुराच्या पाण्याखाली आहेत, तर १ लाखापेक्षा जास्त घरं  पुरात बुडाली.  ४२ हजार पशुधन दगावलं असून, ५ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावरची पिकं नष्ट झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाच्या सूत्रांनी दिली. व्हिएतनामला यंदा मोठ्या संख्येनं वादळांचा फटका बसला असून, हवामान बदल हे याचं कारण असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

October 3, 2025 12:59 PM

views 61

व्हिएतनाममध्ये बुआलॉय चक्रीवादळामुळे ५१ जणांचा मृ्त्यू

व्हिएतनाममध्ये बुआलॉय चक्रीवादळामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ५१वर गेली आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे १४ जण बेपत्ता असल्याची आणि १६४ जण जखमी झाल्याची माहिती व्हिएतनामच्या आपत्ती व्यवस्थापन संस्थेनं दिली आहे. बुआलॉय चक्रीवादळ गेल्या सोमवारी उत्तर मध्य व्हिएतनामला धडकलं. या चक्रीवादळामुळे साडे ४३ कोटी अमेरिकन डॉलर्सचं नुकसान झाल्याची माहिती आहे. रस्ते, शाळा, कार्यालयाच्या इमारतींना मोठा फटका बसला असून हजारो कुटुंबं विजेविना आहेत. २ लाखापेक्षा जास्त घरांचं नुकसान झालं असून ५१ हजार हेक्टरपेक्ष...

September 30, 2025 7:41 PM

views 63

व्हिएतनाममधल्या ‘बुआलोई’ चक्रीवादळात २६ जणांचा मृत्यू, तर २२ बेपत्ता

व्हिएतनाममधल्या ‘बुआलोई’ चक्रीवादळात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २६ वर पोहोचली असून, २२ जण अद्याप बेपत्ता आहेत. वादळाबरोबर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूर आला असून, विमान आणि रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.   गेल्या २४ तासांमध्ये  व्हिएतनामच्या अनेक भागात ३०० मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्याचं व्हिएतनामच्या राष्ट्रीय हवामान संस्थेनं म्हटलं आहे. व्हिएतनामचे प्रधानमंत्री  फाम मिन चिन यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

September 29, 2025 1:32 PM

views 69

व्हिएतनाममध्ये बुआलोई वादळामुळे विमानतळ बंद

व्हिएतनाममध्ये बुआलोई वादळामुळं त्याचा धोका असलेल्या भागातील विमानतळ बंद करण्यात आली आहेत. हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. या वादळामुळं फिलीपिन्समध्ये किमान 10 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक भागात पूराचा तडाखा बसला आहे. हे वादळ एकाच वेळी अनेक नैसर्गिक आपत्तींना कारणीभूत ठरू शकतं असा इशारा देण्यात आला आहे.

June 18, 2025 9:57 AM

views 48

व्हिएतनामला वुटीप वादळाचा मोठा फटका / पुरामुळे सात जणांचा मृत्यू

व्हिएतनामला वुटीप वादळाचा मोठा फटका बसला आहे. मुसळधार पावसाने आलेल्या पुरामुळे सात जणांचा मृत्यू झाला. शेती आणि मालमत्तेला वादळाचा मोठा फटका बसला आहे. डाईक व्यवस्थापन आणि नैसर्गिक आपत्ती प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, क्वांग बिन्ह प्रांतात चार आणि क्वांग ट्राय प्रांतात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 33 हजार हेक्टरहून अधिक भातशेतीचे आणि हजारो हेक्टरवरील जलशेतीचे नुकसान झाले आहे.

May 6, 2025 8:07 PM

views 59

व्हिएतनाममध्ये वेसाक दिनानिमित्त मंत्री किरेन रिजिजू यांचं संबोधन

संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी आज व्हिएतनाम मधल्या हो ची मिन्ह शहरात संयुक्त राष्ट्र वेसाक दिनाच्या उद्घाटन समारंभाला संबोधित केलं. भगवान बुद्धांची कालातीत शिकवण वर्तमानातली अनेक जागतिक आव्हानं आणि समस्यांवर उपाय सुचवणारी असल्याचं ते यावेळी म्हणाले.    त्यानंतर, रिजिजू यांनी व्हिएतनामचे राष्ट्रपती लुओंग कुओंग यांचीही भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशातली व्यापक धोरणात्मक भागिदारी आणखी मजबूत करण्यावर भर दिला. 

September 12, 2024 10:26 AM

views 62

व्हिएतनामध्ये यागी चक्रीवादळामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १७० वर

व्हिएतनामध्ये यागी चक्रीवादळामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १७० वर गेली आहे. हनोईमधून काल हजारो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं. यागी हे आशियातलं या वर्षीचं सर्वातं शक्तिशाली चक्रीवादळ असून, त्यामुळे व्हिएतनाममध्ये प्रचंड पाऊस सुरू आहे. हनोईतली लाल नदी वीस वर्षांमधल्या उच्चांकी पातळीवर पोचली आहे, त्यामुळे तिच्या काठांवर्चया नागरिकांनं जनजीवन विस्कळित झालं आहे.

August 16, 2024 8:46 PM

views 56

सागरी सहकार्य वाढवण्याच्या प्रयत्नांवर भारत आणि व्हिएतनाम यांची चर्चा

परस्पर वाढीसाठी आणि जागतिक कल्याणासाठी सागरी सहकार्य वाढवण्याच्या प्रयत्नांवर भारत आणि व्हिएतनाम यांनी आज चर्चा केली. व्हिएतनाम मधल्या हनोई इथं चौथी भारत-व्हिएतनाम सागरी सुरक्षा परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ही चर्चा करण्यात आली. सागरी वैज्ञानिक संशोधन, महासागर अर्थव्यवस्था, मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण, नौदल आणि तटरक्षक दलाचं सहकार्य आणि सागरी कायद्याची अंमलबजावणी आदी विषयांवर या चर्चेचा प्रामुख्यानं भर होता.

July 31, 2024 11:23 AM

views 53

व्हिएतनामचे प्रधानमंत्री फाम चिन्ह भारत भेटीसाठी नवी दिल्लीत दाखल

व्हिएतनामचे प्रधानमंत्री फाम चिन्ह तीन दिवसांच्या भारत भेटीसाठी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांच्या समवेत असलेल्या शिष्टमंडळात अनेक मंत्री, उपमंत्री आणि व्यापारी नेत्यांचा समावेश आहे. त्यांच्या या भेटीमुळे दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत होईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रण धीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचीही भेट घेणार आहेत. ...