December 24, 2025 3:10 PM

views 97

काँग्रेस वंचित बहुजन आघाडीसोबत…

मुंबई महापालिकेची निवडणुक वंचित बहुजन आघाडीसोबत लढवण्याचा निर्णय झाल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज जाहीर केलं. दोन्ही पक्षात जागा वाटपाच्या संदर्भात स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. पण कुठेही निम्म्या - निम्म्या जागा वाटपाची मागणी झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

October 17, 2024 3:57 PM

views 77

वंचित बहुजन आघाडीची तिसरी यादी जाहीर

वंचित बहुजन आघाडीनं विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. त्यात ३० उमेदवारांची नावं आहेत. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जागांवर हे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.