August 13, 2025 8:26 PM

views 63

वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांना ईडीकडून अटक

वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांना ईडीनं आज अटक केली. त्यांच्यासह शहराचे माजी नगर नियोजक वाय. एस. रेड्डी आणि इतर दोघांनाही ईडीनं अटक केली. काही दिवसांपूर्वी ईडीनं या सर्वांवर धाड टाकली होती आणि त्यांची चौकशी केली होती. अवैध बांधकामांना परवानगी देण्यासाठी पैसे घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

July 29, 2024 7:21 PM

views 51

वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातल्या अर्नाळा किनाऱ्याजवळची अनधिकृत रिसॉर्ट्स जमीनदोस्त

वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातल्या अर्नाळा किनाऱ्याजवळची अनधिकृत रिसॉर्ट्स आज जमीनदोस्त करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही रिसॉर्ट्स पाडण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशावरून महानगर पालिकेनं ही कारवाई केली.   शिवसेना नेते आणि परिवहन समितीचे माजी अध्यक्ष मिलिंद मोरे हे काल कुटुंबासह अर्नाळा किनाऱ्यावरच्या रिसॉर्टवर गेले होते. तिथे स्थानिकांसोबत वाद झाल्यानंतर त्यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्यातल्या दुखापतीमुळं हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचं निधन झालं. मोरे यांच्या निधनानंतर ...