August 31, 2024 10:38 AM

views 47

वाढवण बंदरासह विविध विकास कामांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ

पालघर जिल्ह्यात वाढवण इथं ७६ हजार कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या बंदराचं भूमीपूजन, तसंच २१८ मत्स्यपालन विकास योजनेसह विविध विकास योजनांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. हे आशियातल सर्वात मोठं आणि जगातल्या आघाडीच्या १० बंदरांमधलं एक बंदर असेल. वाढवण बंदरामुळे १२ लाख रोजगार निर्माण होतील, मच्छीमार आणि स्थानिकांच्या जीवनमानात अनेक सुधारणा होतील.   स्थानिक मच्छीमारांना transponders चं वाटप त्यांनी केलं. हे transponder बोटीवर लावायचे असून याद्वारे संपर...

August 30, 2024 7:09 PM

views 45

प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हे वाढवण बंदर राज्यासाठी प्रगतीचं नवं शिखर ठरेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. या बंदराची निर्मिती करताना सर्वांचं हित ध्यानात ठेवू, कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, याची ग्वाही त्यांनी दिली. वाढवण बंदरामुळे आत्मनिर्भर आणि विकसित भारतात महाराष्ट्राची भूमिका आणखी मजबूत होईल, असं केंद्रीय बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितलं.    वाढवण बंदरामुळे आर्थिक क्षेत्रात मुंबईचं आघाडीचं स्थान कायम राहील, यामुळे मच्छीमारांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होतील, असं उपमुख...

August 30, 2024 7:04 PM

views 52

मालवण राजकोटमधला शिवरायांचा पुतळा पडल्याबद्दल प्रधानमंत्र्याकडून दिलगिरी व्यक्त

देशातल्या सर्व बंदरांमधून होणाऱ्या एकूण कंटेनर वाहतुकीपेक्षा अधिक कंटेनर वाहतूक या बंदरातून होईल. इथं येणाऱ्या हजारो जहाजं आणि कंटेनर मुळे परिसराचा चेहरा मोहरा बदलून जाईल. महाराष्ट्राकडे विकासासाठी लागणारं सामर्थ्य आणि संसाधनं आहेत. महाराष्ट्राला समुद्री व्यापाराचा इतिहास आहे आणि भविष्यातही व्यापाराच्या संधी आहेत, असं ते म्हणाले.  महाराष्ट्राचा, या परिसराचा विकास होऊ नये असं वाटत असल्यानं विरोधक या बंदराला विरोध करत असल्याची टीका मोदी यांनी केली.    मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवा...

August 29, 2024 7:06 PM

views 69

वाढवण बंदर देशाची वेगळी ओळख निर्माण करायला मदत करेल – मंत्री सर्बानंद सोनोवाल

वाढवण बंदर महाराष्ट्रासोबत देशाची वेगळी ओळख निर्माण करायला मदत करेल असा विश्वास केंद्रीय बंदर, नौकानयन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज व्यक्त केला. वाढवण बंदराचं उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ते पालघर इथं आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते.   आशिया खंडातलं हे सर्वात मोठं बंदर असेल आणि जगातल्या आघाडीच्या १० बंदरामध्ये याचा समावेश होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं वाटचाल करताना हे बंदर एक महत्व...