November 3, 2024 4:02 PM

views 45

उत्तराखंडमधल्या केदारनाथ धाम मंदीराचे दरवाजे आज विधिवत बंद

प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उत्तराखंडमधल्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातल्या  केदारनाथ धाम मंदीराचे दरवाजे आज विधिवत बंद करण्यात आले. हिवाळा ऋतुमुळे भाऊबीजेचा मुहुर्त साधत सकाळी साडेआठ वाजता दरवाजे बंद झाले. या निमित्तानं १० क्विंटल फुलांचा वापर करून मंदीर आणि मंदीर परिसराची सजावट केली आहे. मंदिराचे दरवाजे बंद झाल्यानंतर बाबा केदार यांची पालखीचं उखीमठ इथल्या ओंकारेश्वर मंदिरात हिवाळी निवासासाठी प्रस्थान झालं. दरम्यान, उत्तरकाशीतल्या यमुनोत्री धाम मंदारीचे दरवाजेही आज दुपारी सव्वा बारा ...

October 10, 2024 9:52 AM

views 70

अडतिसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा उत्तराखंडमध्ये पुढच्या वर्षी 28 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या काळात होणार

अडतिसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा उत्तराखंडमध्ये पुढच्या वर्षी 28 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या काळात आयोजित करण्यात आल्या आहेत. भारतीय ऑलिंपिक संघटनेची बैठक येत्या पंचवीस तारखेला होणार आहे. त्यात या स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी नुकतीच भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांची भेट घेतली होती आणि उत्तराखंड राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी पूर्णपणे तयार असल्याचं म्हटलं होतं.

August 31, 2024 2:49 PM

views 47

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आजपासून दोन दिवसांच्या उत्तराखंड दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आजपासून दोन दिवसांच्या उत्तराखंड दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते देहरादूनमधल्या CSIR - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम इथं शास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांशी चर्चा करतील. तसंच ते राष्ट्रीय भारतीय लष्करी महाविद्यालय आणि एम्स संस्थेलाही भेट देणार आहेत.

August 8, 2024 2:29 PM

views 41

जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थान मध्ये मुसळधार पावसाची शक्यता

  भारतीय हवामान विभागानं देशाच्या पूर्व, पश्चिम, मध्य, वायव्य आणि ईशान्य भागात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढल्या ५ दिवसांत देशाच्या दक्षिण भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर कर्नाटकच्या किनारपट्टीवर आज मुसळधार पावसाची शक्यता आहे.   हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. झारखंड, उत्तर ओदिशा, छत्तीसगडमध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्...

August 6, 2024 3:11 PM

views 51

उत्तराखंड : ट्रेक मार्गावर अडकलेल्या १४००हून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं

उत्तराखंडमध्ये केदार खोऱ्यात हवामानात सुधारणा झाल्यानं १४०० हून अधिक लोकांना भारतीय वायुसेनेनं हेलिकॉप्टरच्या मदतीनं सुरक्षित ठिकाणी हलवलं. हे सगळेजण पावसामुळं खचलेल्या ट्रेक मार्गावर अडकून पडले होते. याशिवाय वायुदलांनं राज्य सरकारच्या हेलिकॉप्टरद्वारे १३६ यात्रेकरूंची सुखरूप सुटका केली. तर ५०९ यात्रेकरूंना केदारनाथ इथून लिंचोली इथं आणण्यात आलं. याशिवाय गौरीकुंड इथून सोनप्रयाग मार्गे ५८४ जणांची आणि चौमासी मार्गे १७२ जणांची सुटका करण्यात आली. गुरुवारी बचाव कार्य सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत ११ हज...

August 2, 2024 8:14 PM

views 41

केदारनाथ धाम येथे अडकलेल्या यात्रेकरूंना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू

उत्तराखंडमध्ये केदारनाथ धाम आणि यात्रा मार्गावर दरड कोसळल्यानं अडकलेल्या यात्रेकरूंचं बचावकार्य आज दुसऱ्या दिवशीही सुरु राहिलं. आज या भागातून दीड हजार भाविकांना पायी चालत तर ६०० जणांना हेलिकॉप्टरमधून सुरक्षित ठिकाणी पोचवण्यात आलं. आतापर्यंत ६ हजारांहून अधिक यात्रेकरूंना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. या कामात मदत करत असलेलं लष्कराचं हेलिकॉप्टर खराब हवामानमुळं आज सकाळी एकच फेरी करू शकलं. एसडीआरएफ, एनडीआरएफ, डीडीआरएफ, स्थानिक पोलीस यांच्या मदतीनं जिल्हा प्रशासनानं बचावकार्य सुरु ठेवलं आहे. या भागात आण...

July 5, 2024 11:30 AM

views 57

अमरनाथ यात्रेसाठी भगवतीनगर तळावरील शिबिरामधून 7,919 भाविक 259 समूहात रवाना

अमरनाथ यात्रेसाठी काल जम्मू इथल्या भगवतीनगर तळावरील शिबिरामधून 7 हजार 919 भाविक 259 समूहात रवाना झाले. यात्रेकरूंची ही 7 वी तुकडी असून, त्यात 5 हजार 241 पुरुष, एक हजार 435 महिला, 214 साधू आणि 13 साध्वी तसच 16 लहान मुलांचा समावेश आहे. यामध्ये बालतल आधार शिबिरासाठी 2 हजार 542 तर पहलगाम शिबिरासाठी 4 हजार 377 भाविक रवाना झाले असून, तिथून अमरनाथ यात्रेचा त्यांचा पुढील प्रवास सुरू होणार आहे.