December 23, 2024 12:42 PM

views 67

उत्तरप्रदेशात पोलिसांच्या चकमकीत तीन खलिस्तानी अतिरेकी ठार

उत्तर प्रदेशातल्या पिलभीत जिल्ह्यात आज सकाळी खलिस्तानी अतिरेकी आणि पोलिसांच्या चकमकीत तीन अतिरेकी ठार झाले. हे तिन्ही खलिस्तानवादी अतिरेकी १९ डिसेंबर रोजी पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यातल्या एका पोलीस चौकीवर झालेल्या हातबॉम्ब हल्ल्यात सहभागी होते. पिलभीत जवळच्या भागात खलिस्तानवादी अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पंजाब आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्याच्या पोलिसांनी संयुक्तपणे शोधमोहिम सुरु केली. पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी गोळीबार सुरु केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसां...

December 13, 2024 3:21 PM

views 55

महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ७ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण

प्रयागराजच्या भूमीवर एक इतिहास रचला जात असून महाकुंभ मेळ्याच्या  आयोजनामुळे  देशाची  सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळख एका नव्या उंचीवर पोहोचेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.    प्रयागराजमध्ये पुढच्या वर्षी होणार असलेल्या महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ७ हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.    भारत हा तीर्थक्षेत्रांचा आणि पवित्र नद्यांचा देश आहे. या नद्यांचं माहात्म्य, त्यांचा संगम म्हणजे ...

December 6, 2024 8:12 PM

views 55

उत्तरप्रदेशात बस अपघातात ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी

उत्तरप्रदेशात कनोज जिल्ह्यात आज झालेल्या एका बस अपघातात ८ जण मरण पावले असून १८ जण गंभीर जखमी झाले आहेत. आग्रा लखनौ महामार्गावर कडेला उभ्या असलेल्या ट्रकला बसने धडक दिल्यामुळे ती उलटली . जखमींना सैफई रुग्णालयात दाखल केलं आहे. जलशक्ती राज्यमंत्री स्वतंत्र देव सिंग यांनी अपघातस्थळी पोचून मदत कार्याची देखरेख केली . प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी २ लाख रुपये  तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांचं अर्...

December 2, 2024 1:31 PM

views 51

उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमध्ये १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारीदरम्यान महाकुंभ मेळा

उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान महाकुंभ मेळा होणार असून ४३ कोटींहून अधिक भाविक या सोहळ्याला हजेरी लावतील, अशी अपेक्षा आहे. या भाविकांच्या सुविधेसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातल्या रस्ते आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला.

December 1, 2024 3:02 PM

views 54

प्रयागराजमध्ये १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान महाकुंभ मेळा होणार

उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान महाकुंभ मेळा होणार असून ४३ कोटींहून अधिक भाविक या सोहळ्याला हजेरी लावतील अशी अपेक्षा आहे. या भाविकांच्या सुविधेसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातल्या रस्ते आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. ६३ पूर्णांक १७ शतांश किमी लांबीच्या रायबरेली-प्रयागराज राष्ट्रीय महामार्गाचं रुंदीकरण, चार ठिकाणी चौपदरी बायपास, प्रयागराज इनर रिंग रोड फाफामाऊ इथं गंगा नद...

November 24, 2024 6:56 PM

views 42

उत्तर प्रदेशात जामा मशिदीचं सर्वेक्षण करण्याच्या प्रकरणावरून झालेल्या हिंसाचारात तीन जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातल्या संभल जिल्ह्यात जामा मशिदीचं सर्वेक्षण करण्याच्या प्रकरणावरून झालेल्या हिंसाचारात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. जामा मशीदीचं सर्वेक्षण करून येणाऱ्या पथकावर आणि पोलिसांवर जमावाने दगडफेक केली, अशी माहिती मोरादाबादचे पोलीस आयुक्त अंजनेय कुमार सिंह यांनी दिली. हिंसाचारात सहभागी असलेल्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी  अतिरिक्त पोलीस कुमक बोलावण्यात आली होती. आता  परिस्थिती  नियंत्रणात  आहे, असं पोलीस आयुक्तांनी  सांगितलं. 

October 24, 2024 1:38 PM

views 70

राजस्थान आणि उत्तरप्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपची उमेदवारी यादी जाहीर

राजस्थान आणि उत्तर प्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राजस्थामधल्या चौरासी विधानसभा मतदारसंघासाठी तर उत्तर प्रदेशमध्ये कुंदरकी, गाझियाबाद, खैर, करहल, फुलपूर, कटेहरी आणि मझवा या मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे.

September 30, 2024 1:30 PM

views 57

उत्तरप्रदेशात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात ५ जणांचा मृत्यू

उत्तरप्रदेशात काल झालेल्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. नोएडा इथं ट्रॅक्टर आणि कारच्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सोनभद्रमध्ये कारचालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातात एक जणाचा...

September 21, 2024 1:23 PM

views 70

उत्तर प्रदेशात बस अपघातात ३८ प्रवासी जखमी

उत्तर प्रदेशात आग्रा लखनौ महामार्गावर खासगी बस दुभाजकाला धडकून उलटल्याने आज झालेल्या अपघातात ३८ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे.   सर्व जखमींना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या बसमध्ये ८० प्रवासी प्रवास करत होते. हे सर्व प्रवासी गोंडा इथले रहिवासी आहेत. मद्यधुंद चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

September 18, 2024 12:53 PM

views 58

उत्तरप्रदेशात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

उत्तरप्रदेशात सततचा मुसळधार पाऊस आणि धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यामुळे आलेल्या पुराचा फटका चोवीस जिल्ह्यातल्या पाच लाख लोकांना बसला आहे. राज्यातल्या जवळपास सर्व नद्यांना पूर आला असून गंगा आणि घागरा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. राज्यातल्या प्रमुख शहरातल्या सखल भागात पाणी साचलं आहे. वाराणसी आणि प्रयागराजमधल्या हजारो कुटुंबांना मदत छावण्यांमध्ये स्थलांतरित केलं असून प्रशासनाकडून आवश्यक ती मदत त्यांना पुरवली जात आहे. वाराणसीतले सर्व घाट पाण्याखाली गेले असून नदीत नौकाविहार करण्यास बंदी घालण्यात...