June 23, 2025 1:08 PM

views 20

शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करण्यासंदर्भात संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचं भावनिक आवाहन

इराणवर अमेरिकेनं काल केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राच्या न्यू यॉर्कमधील मुख्यालयात सुरक्षा परिषदेचं आपत्कालीन विशेष सत्र काल पार पडलं. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी या भागात शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहन केलं. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था अर्थात IAEA च्या निरीक्षकांनी इराण अणुकार्यक्रमासाठी विश्वसनीय, व्यापक आणि पडताळणीयोग्य उपाय; शोधण्यासाठी प्रयत्न करावेत असंही त्यांनी आवाहन केलं. रशिया, चीन आणि पाकिस्तानने सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक बोलावून ता...