May 2, 2025 3:33 PM

views 21

आयुष औषध केंद्र तहसील स्तरावर उघडणार- प्रतापराव जाधव

आयुष प्रणाली आकर्षणाचं केंद्र बनत असून जनऔषधी केंद्राच्या धर्तीवर आयुष औषध केंद्र सुरु करण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं. पुणे जिल्ह्यात लोणावळा इथल्या कैवल्यधाम योग संस्थेमध्ये दोन दिवसांच्या राष्ट्रीय आयुष मिशन परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर काल ते बोलत होते. आयुष औषध केंद्र तहसील स्तरावर उघडण्यात येणार आहेत. यामुळे आयुष उपचारपद्धतीची सर्व औषधं एकाच ठिकाणी वाजवी दरात उपलब्ध होतील असंही जाधव यावेळी म्हणाले. आयुष मंत्रालयाच्या वाढत...

February 18, 2025 8:16 PM

views 20

तोंड, स्तन आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करणाऱ्या लशींची चाचणी सुरू

महिलांना होणाऱ्या कर्करोगावर प्रतिबंधक लस येत्या पाच ते सहा महिन्यांत उपलब्ध होईल अशी माहिती केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण आणि आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली. यात प्रामुख्यानं तोंडाचा, स्तनांचा आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोगावरच्या लसीचा समावेश आहे.    ते आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. या लसीवरचं संशोधन जवळपास पूर्ण झालं असून चाचण्यांना सुरुवात झाली आहे. लवकरच ही लस उपलब्ध होईल आणि ९ ते १६ वर्षं वयोगटातल्या मुली लसीकरणासाठी पात्र असतील, असंही जाधव म्हणाले.  &...

December 6, 2024 7:17 PM

views 16

वायू प्रदूषणामुळे आजारी पडल्याची अथवा मृत्यू झाल्याची कोणतीही आकडेवारी नाही – राज्यमंत्री प्रतापराव जाधव

वायू प्रदूषणामुळे आजारी पडल्याची अथवा थेट मृत्यू झाल्याची कोणतीही ठोस आकडेवारी उपलब्ध नसल्याची माहिती आज सरकारनं लोकसभेत आज दिली. श्वसनाचे आजार आणि त्याच्याशी संबंधित इतर आजारामध्ये प्रदूषण हे महत्त्वाचं कारण असल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सभागृहात विचारलेल्या एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.   खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व ठोस उपाययोजना सरकार वचनबद्ध असल्याचं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल...

September 30, 2024 7:23 PM

views 20

समग्र आरोग्यसेवा मानकामुळे जागतिक चिकित्सा पर्यटनाच्या नकाशावर भारताला विशेष स्थान – केंद्रीय आयुष्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव

समग्र आरोग्यसेवा मानकामुळे जागतिक चिकित्सा पर्यटनाच्या नकाशावर भारताला विशेष स्थान मिळालं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय आयुष्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज केलं. मुंबईत आयुष वैद्यकीय पर्यटन परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. जगभरातून लाखो लोग आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी भारतात येतात. शरीरस्वास्थासोबतच मानसिक आणि अध्यात्मिक स्वास्थ्यालाही महत्व देणारी पारंपरिक भारतीय चिकित्सा आणि आयुष पद्धती यांच्या संयोगातून समग्र आरोग्यसेवा मानक तयार झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.  या परिषदेचं आय...