October 6, 2025 3:35 PM

views 38

विकसित भारतासाठी शैक्षणिक क्षेत्राला सक्षम करणं महत्त्वाचं-नितीन गडकरी

भारत हा जगातील तिसरी आर्थिक महाशक्ती होण्याच्या दिशेने वाटचाल करत असून हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शैक्षणिक क्षेत्राला सक्षम करणं महत्त्वाचं आहे, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं २० व्या एफ आय सी सी आय उच्च शिक्षण परिषदेत बोलत होते. कोणत्याही देशाच्या प्रगतीसाठी शिक्षण अतिशय महत्त्वाचं असून भारताला विकसित देश बनवण्यासाठी शिक्षण महत्त्वाची भूमिका बजावेल, असं गडकरी म्हणाले. त्यामुळे शिक्षण, संशोधन क्षेत्राला प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांग...

October 4, 2025 5:48 PM

views 40

शेतकऱ्यांनी बाजारपेठेच्या मागणीनुसार पीकपद्धतीत बदल करून उत्पन्नवाढ करावी-नितीन गडकरी

शेतकऱ्यांनी बाजारपेठेच्या मागणीनुसार पीकपद्धतीत बदल करून उत्पन्नवाढ करावी, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपूर मध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यात ते  आज बोलत होते. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं, तर देशाचं अर्थकारण मजबूत होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून उत्पादन आणि मूल्यवृद्धी या दोन्ही दिशांनी पुढे जायला हवं असं ते म्हणाले. साखर कारखाने पूर्ण क्षमतेनं चालावेत यासाठी नागपूर, भंडारा आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ऊस लागवडीला प्र...

September 13, 2025 3:43 PM

views 50

भारताची पहिली फ्लॅश चार्ज इलेक्ट्रिक बस लवकरच नागपूरहून सुरू होणार-नितीन गडकरी

भारताची पहिली फ्लॅश चार्ज इलेक्ट्रिक बस लवकरच नागपूरहून सुरू होणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केली. १३५ आसनक्षमतेची ही वातानुकूलित बस लवकरच नागपुरात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे. सुरुवातीला ही सेवा रिंग रोड मार्गावर असेल आणि नंतर शहराच्या इतर मार्गांवर तिचा विस्तार होईल असं गडकरी यांनी सांगितलं. नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील २ पूर्णांक ८५ शतांश किलोमीटर लांबीच्या, चार मार्गिका असलेल्या ज्ञानयोगी डॉ. श्रीका...

March 20, 2025 10:07 AM

views 34

वीजनिर्मितीत हरित ऊर्जा निर्मितीचा वाटा ४२ % – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

देशात सध्या एकंदर वीजनिर्मितीच्या क्षेत्रात हरित ऊर्जा निर्मितीचा वाटा 42 टक्के इतका आहे अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. नवी दिल्लीत काल ३२व्या कनवर्जन्स इंडिया एक्सपो, स्मार्ट मोबईलीटी इंडिया एक्सपो आणि १०व्या स्मार्ट सिटी इंडिया कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते.   मंत्री गडकरी म्हणाले.  केंद्र सरकार पर्यायी इंधन आणि आणि जैव इंधन निर्मितीला प्रोत्साहन देत आहे. येत्या भविष्यात देशातील काही शहरांमधील प्रवासाचा वेळ अगदी कमी करण्याच्या दृष्टीने ...

March 2, 2025 8:14 PM

views 33

धापेवाडा गावाचा पर्यटन आणि तीर्थस्थळाच्या दृष्टीने विकास होणार-नितीन गडकरी

विदर्भाचं पंढरपूर अशी ओळख असलेल्या धापेवाडा गावाचा पर्यटन आणि तीर्थस्थळाच्या दृष्टीने विकस होणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली. त्यांच्या हस्ते नागपुरात धापेवाडा इथल्या विठ्ठल मंदिरातल्या १६४ कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचं भूमिपूजन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. धापेवाडा इथे टेक्स्टाईल पार्क, मंदिराचा जिर्णोद्धार, जलशुद्धीकरण प्रकल्प, स्टेडियम या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे होणार आहेत. ही परिवर्तनाची सुरुवात लोकांच्या सहकार्या...

January 8, 2025 8:48 PM

views 29

रस्ते अपघातातल्या जखमींसाठी दीड लाखापर्यंत विनारोकड उपचार योजना सुरु

रस्ते अपघातातल्या जखमींसाठी विनारोकड उपचार देणारी योजना केंद्र सरकारनं आजपासून सुरू केली. याअंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतचे उपचारांसाठी कोणतीही रोख रक्कम द्यावी लागणार नाही. याशिवाय हिट अँड रनमध्ये मृत्यू झालेल्यांच्या वारसांना २ लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाईल. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नवी दिल्लीत आज ही घोषणा केली.    गेल्या वर्षभरात देशभरात रस्ते अपघातात १ लाख ८० हजार व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यापेैकी ३० हजार जण हेल्मेट न घातल्यानं मृत्यूमुखी पडले. मृतांमध्ये ...