July 7, 2025 8:16 PM

views 31

इराणमधे गुहेत शोधकार्य करताना मिथेन वायूमुळे १२ तुर्की सैनिकांचा मृत्यू

इराणमधे एका गुहेत शोधकार्य करताना मिथेन वायूच्या संपर्कात आल्यामुळे बारा तुर्की सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तुर्कियेच्या संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. २०२२मध्ये इराकमध्ये कुर्दिस्तान वर्कर्स पार्टीच्या दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करताना गोळीबार झाला होता. या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी काल तुर्किये सैन्याचे १९ जवान गुहेत गेले होते. त्यांना मिथेनच्या संपर्कात आल्यामुळे त्रास सुरू झाला. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

March 22, 2025 7:09 PM

views 33

इस्तांबूलच्या महापौरांच्या अटकेविरोधात निदर्शनं, ३०० हून अधिकजण ताब्यात

इस्तांबूलचे महापौर एकरेम इमामोगलू यांना अटक केल्याच्या निषेधार्थ तुर्कस्थानच्या विविध शहरांत निदर्शनं करणाऱ्या सुमारे ३०० निदर्शकांना तुर्की पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भ्रष्टाचार आणि दहशतवादाशी संबंध असल्याच्या कथित आरोपावरून इमामोगलू यांना अटक केल्यानंतर गेल्या बुधवारपासून तुर्कस्थानच्या अनेक शहरांमध्ये या अटकेविरोधात शांततापूर्ण निदर्शनं करण्यात येत होती.  

January 21, 2025 8:12 PM

views 27

तुर्कीच्या हॉटेलला लागलेल्या आगीत ६६ जणांचा मृत्यू

तुर्कीच्या वायव्य भागात असलेल्या एका स्की रिसॉर्टमधल्या हॉटेलला आग लागल्याने ६६ जणांचा मृत्यू झाला तर ५१ जण जखमी झाले. आज सकाळी ही आग लागली. या हॉटेलमध्ये वास्तव्याला आलेल्या २३० पाहुण्यांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.