July 12, 2025 4:01 PM

views 64

मोबाईल टॉवरचे यंत्र चोरणाऱ्या टोळीला अटक

मोबाईल टॉवरचे बेसबॅन्ड युनिट चोरणाऱ्या चारजणांच्या टोळीला नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. हे उपकरण चोरी करणाऱ्यांकडून 56 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मोबाईल टॉवरचे 5 जी बेसबॅन्ड चोरी होण्याचं प्रमाण तळोजा, खारघर, पनवेल शहर या भागात वाढलं होतं. उपकरणं चोरी झाल्याने नेटवर्क विस्कळीत होऊन नेटवर्क मध्ये अडचणी निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला.   ही उपकरणं बसवण्याचं काम करणाऱ्या कंपनीचा माजी कर्मचारी असलेल्याला एकाचा चोरीत सहभाग उघड झाल्यावर त्याला त्...