January 22, 2026 1:39 PM

views 68

तमिळनाडू विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी विरोधी पक्ष नेते पळणीसामी यांची भेट घेतली

तमिळनाडू विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी आज चेन्नईमध्ये अण्णा द्रमुक पक्षाचे महासचिव आणि विरोधी पक्ष नेते पळणीसामी यांची भेट घेतली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या मित्र पक्षांशी आगामी निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा करण्यासाठी गोयल चेन्नई दौऱ्यावर आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची उद्या तामिळनाडूमध्ये जाहीर सभा होणार असून ही सभा राज्याचं राजकीय चित्र बदलून टाकेल, असा विश्वास पळणीसामी यांनी व्यक्त केला. स्टालिन यांच्या सनातन विरोधातल्या...