September 17, 2024 5:47 PM

views 29

वाशिम जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा अभियानाला सुरुवात

देशभरात आजपासून स्वच्छता ही सेवा पंधरवड्याला सुरुवात झाली आहे. वाशिममध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या उपस्थितीत या अभियानाला सुरुवात झाली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालय आणि परिसर स्वच्छ केला. वाशिम तालुक्यातल्या आडोळी, मालेगाव तालुक्यातल्या ढोरखेडा, कारंजा तालुक्यातल्या गायवळ इथंही स्वच्छता ही सेवा पंधरवड्याला सुरुवात झाली.

September 14, 2024 10:55 AM

views 46

स्वच्छता ही सेवा या अभियानाचं नवी दिल्लीत उद्घाटन

स्वच्छ भारत अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त देशात येत्या 17 तारखेपासून 2 ऑक्टोबर या कालावधीत 'स्वच्छता ही सेवा' ही मोहीम राबवण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.   या मोहिमेत कार्यालयं, आस्थापनांमध्ये स्वच्छता राखण्याच्या दृष्टिनं विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. स्वच्छता हा एक संस्कार बनावा यासाठी यामध्ये प्रयत्न केले जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.