September 23, 2025 3:07 PM

views 74

‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमेत सर्वांनी सहभाग घेण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

स्वच्छता ही सेवा या मोहिमेत देशभरातल्या सर्वांनी सक्रियपणे सहभाग घ्यावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. स्वच्छता ही सामूहिक जबाबदारी असून हा उपक्रम देशाप्रति अभिमानाची भावना प्रतिबिंबित करणारा एक प्रेरणादायी उपक्रम असल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. येत्या २५ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता स्वच्छता उत्सवात सहभागी होऊन श्रमदान करण्याचं आवाहनही प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशातून केलं आहे. 

September 23, 2025 1:13 PM

views 54

‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात देशभरातले दीड कोटीपेक्षा जास्त नागरिक सहभागी

स्वच्छतेचं महत्त्व सर्वांच्या मनावर ठसवण्यासाठी सुरु झालेल्या स्वच्छता ही सेवा या अभियानात आत्तापर्यंत देशभरातले दीड कोटीपेक्षा जास्त नागरिक सहभागी झाले आहेत. केंद्रीय आवास आणि शहरी विकास मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार या अभियानांतर्गत आत्तापर्यंत देशात ११ लाखापेक्षा जास्त ठिकाणं ठरवून दिली असून यापैकी जवळपास अडीच लाख ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत विविध ठिकाणी अनेक कार्यक्रम, उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

September 16, 2025 3:59 PM

views 108

‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाला उद्यापासून सुरुवात

स्वच्छताही सेवा या अभियानाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. हे अभियान यंदा स्वच्छतोत्सव म्हणून साजरं होणार असल्याची माहिती केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री मनोहर लाल यांनी नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत दिली. या अभियानादरम्यान देशभर मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहिमा आणि श्रमदान होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. २५ सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीदिनी एक दिवस, एक साथ, एक तास श्रमदान हा देशव्यापी कार्यक्रम राबवणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

September 15, 2025 8:15 PM

views 58

परभणीत स्वच्छता सेवा अभियानाचं आयोजन

ग्रामीण स्वच्छ भारत मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्या अंतर्गत परभणी जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता सेवा अभियान राबवलं जाणार आहे. या उपक्रमात  सर्व नागरिक, संस्था, शाळा, महाविद्यालयं, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट तसंच शासकीय  विभागांनी मोठ्या संख्येनं  सहभागी व्हावं, असं  आवाहन जिल्हा परभणी जिल्हा परिषदेनं केलं आहे.

September 22, 2024 5:58 PM

views 45

नांदेड महानगरपालिकेतर्फे गोदावरी नदीघाटावर स्वच्छता मोहीम

‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमे अंतर्गत नांदेड महानगरपालिकेने गोदावरी नदीघाटावर आज स्वच्छता मोहीम राबवली. स्वच्छता मोहिमेत शहरातल्या अनेक महाविद्यालयातल्या विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. महानगरपालिका प्रशासनाच्या पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्याच्या आवाहनाला  नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. जवळपास ३३ हजार गणेश मूर्तींचं विसर्जन पालिकेच्या कृत्रिम तलावात करण्यात आलं. तसंच ३५ मॅट्रिक टन निर्माल्य गोळा करण्यात आलं. यातून गांडूळ खत तयार करण्यात येणार असल्याचं पालिका प्रशासनानं सांगितलं आहे....

September 17, 2024 4:29 PM

views 74

‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाला आजपासून देशभरात सुरुवात

देशभरात आजपासून ‘स्वच्छता ही सेवा अभियान २०२४’ ला सुरुवात झाली. येत्या २ ऑक्टोबरपर्यंत हे अभियान सुरू असेल. स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता ही यंदाच्या अभियानाची संकल्पना आहे. यंदाच्या अभियानासाठी संपूर्ण समाजाचा सहभाग असावा या दृष्टीने श्रमदान मोहिमा, जन भागिदारी आणि सफाई मित्र हे तीन प्रमुख स्तंभ म्हणून निश्चित केले गेले आहेत. या अभियाना अंतर्गत पर्यटनस्थळं, सार्वजनिक इमारती, व्यापारी क्षेत्र, पाणवठे, प्राणिसंग्रहालयं, अभयारण्ये, सामुदायिक आणि सार्वजनिक स्वच्छतागृह अशा विविध ठिकाणी स्वच्छतावि...

September 16, 2024 1:57 PM

views 50

देशभरात उद्यापासून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाला सुरूवात

  देशभरात उद्यापासून 'स्वच्छता ही सेवा' अभियानाला सुरूवात होत आहे. हे अभियान गांधी जयंतीपर्यंत म्हणजेच दोन ऑक्टोबर पर्यंत सुरू राहाणार आहे. 'स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता' ही यावर्षीच्या अभियानाची मुख्य संकल्पना आहे.   या अंतर्गत लोकसहभागातून श्रमदान आणि सामूहिक कार्याच्या माध्यमातून पर्यटन स्थळं, सार्वजनिक इमारती, व्यावसायिक परिसर, जलाशय, प्राणीसंग्रहालय, अभयारण्य आणि सार्वजनिक स्वच्छतागृह सारख्या ठिकाणी स्वच्छता मोहिम राबवण्यात येणार आहेत. सर्व केंद्रीय तसच राज्य मंत्रालयं लोकसहभागातून...