September 22, 2024 10:58 AM

views 33

स्वच्छता ही सेवा’ अभियानानिमित्त मंत्री भूपेंद्र यादव मुंबईतील जुहू चौपाटी समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेत सहभागी

‘आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिन मोहीम’ आणि ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानानिमित्त केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव काल मुंबईत जुहू चौपाटी समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. स्वच्छता अभियानासाठी विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती असल्याबद्दल समाधान व्यक्त करून तरुणांमध्ये स्वच्छतेबाबत होत असलेली जागृती ही सकारात्मक बाब असल्याचं राज्यपाल यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी उ...

September 18, 2024 2:39 PM

views 42

भारतीय रेल्वे विभागाची ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमेला सुरूवात

स्वच्छ भारत अभियानाच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त, 'स्वच्छता ही सेवा २०२४' ही मोहीम १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात देशभरात राबवली जात आहे. त्या अंतर्गत भारतीय रेल्वे विभागानेही आज नवी दिल्ली इथल्या रेल भवनमध्ये या मोहिमेची सुरुवात केली. रेल्वे मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष सतीश कुमार यांनी या कार्यक्रमात रेल्वे कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली.