May 30, 2025 1:05 PM

views 15

नवी दिल्लीत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण मोहिमेचा प्रारंभ

केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी काल नवी दिल्ली इथं जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल आणि स्वच्छता विभागाद्वारे आयोजित देशव्यापी स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण मोहिमेचा प्रारंभ केला. या कार्यक्रमात बोलताना, केंद्रीय मंत्री सी आर पाटील यांनी "मापन ते व्यवस्थापन" या तत्वाचं  महत्व पुन्हा एकदा अधोरेखित केलं. स्वच्छता हे काही काळापुरतं ठरवलेलं  ध्येय नसून हा एक निरंतर प्रवास आहे, असं पाटील म्हणाले.