September 3, 2024 10:19 AM

views 104

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी

पॅरिसमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेचा कालचा पाचवा दिवस भारतासाठी आनंददायक ठरला ठरला. दोन सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांसह पदक तालिकेत भारत १५ व्या क्रमांकावर पोहोचला. सुमीत अंटीलनं भालाफेकीत मिळवलेलं सुवर्णपदक हे कालच्या दिवसाचं खास वैशिष्ट्य ठरलं. सुमीतनं ७० पूर्णांक ५९ शतांश मीटरवर भालाफेक करून पॅरालिम्पिकमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला. बॅडमिंटनमध्ये पुरूष एकेरीच्या SL3 मध्ये नितेश कुमारनं सुवर्णपदक जिंकलं. तर सुहाज यतिराज यानं SL4 इव्हेंटमध्ये रौप्य पदकाची कमाई केली. बॅडमिंटनच्या महिला...