December 6, 2025 8:13 PM

views 73

सुदानमध्ये बालवाडीवर झालेल्या हल्ल्यात ३३ बालकांसह ५० जणांचा मृत्यू

दक्षिण सुदानमध्ये सुदानच्या अर्धसैनिक दलांनी केलेल्या एका बालवाडीला लक्ष्य करून केलेल्या ड्रोन हल्ल्यात किमान  ५० जण ठार झाले असून यात ३३ बालकांचा समावेश आहे. जखमींवर उपचार करणारं वैद्यकीय पथक मदतीसाठी घटनास्थळी पोचल्यावर दुसरा हल्ला झाल्यानं हे पथकही बाली पडलं. याच परिसरातल्या नागरी वस्तीवर देखील हल्ला करण्यात आला. इमर्जंसी लॉयर्स या मानवाधिकार संघटनेनं हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.

October 14, 2025 2:42 PM

views 100

दक्षिण सुदानमध्ये आलेल्या पुरामुळे १९ जण मृत्युमुखी

दक्षिण सुदानमध्ये आलेल्या पुरामुळे जवळजवळ ८ लाख ९० हजार नागरिकांना पुराचा फटका बसला असून, आतापर्यंत १९ जण मृत्युमुखी पडले आहेत. मुसळधार पाऊस आणि नाईल नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे देशभरात पूरस्थिती निर्माण झाली आहे.   जोंगलेई आणि युनिटी या राज्यांमधल्या नागरिकांना पुराचा सर्वात जास्त फटका बसला आहे. घरं, शेती, शाळा, आरोग्य सेवा, रस्ते आणि इतर महत्वाच्या पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झालं असून, मदत कार्य  गुंतागुंतीचं झाल्याचं संयुक्त राष्ट्रांच्या प्रवक्त्यानं सांगितलं.

April 12, 2025 8:22 PM

views 91

सुदानच्या दारफूर इथं RSF नं केलेल्या हल्ल्यात किमान ३२ नागरिक ठार

सुदानच्या दारफूर इथं RSF नं काल केलेल्या हल्ल्यात किमान ३२ नागरिक ठार झाल्याचा दावा सुदानच्या लष्करानं केला आहे. मृतांमध्ये चार महिला आणि दहा मुलांचा समावेश आहे. या हल्ल्यात १७ नागरिक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. आरएसएफनं आत्मघाती ड्रोन हल्ला केला तसंच अनेक ठिकाणी गोळीबारही केल्याची माहिती सुदान लष्करानं केला.   अल फशारमध्ये सुदान लष्कर आणि आरएसएफ मध्ये २०२४ पासून संघर्ष सुरू असून त्यात आतापर्यंत २९ हजार ६८३ नागरिकांचा जीव गेला आहे. यामुळे दीड लाखांहून अधिक नागरिक विस्था...

November 19, 2024 2:51 PM

views 63

सुदानमध्ये तात्काळ युद्धविराम करण्याच्या ठरावावर रशियाचा नकार

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सुदानमध्ये तात्काळ युद्धविराम करण्याच्या ठरावावर रशियानं व्हेटो अर्थात नकाराधिकार वापरला आहे. या परिषदेतील १५ सदस्य राष्ट्रांपैकी या निर्णयाविरोधात व्हेटो वापरणारा रशिया हा एकमेव देश आहे.