February 2, 2025 11:42 AM

views 19

सुदानमध्ये निमलष्करी शीघ्र कृती दलानं केलेल्या बॉम्बहल्ल्यात 54 नागरीक ठार

सुदानची राजधानी खार्टूममध्ये ओमदुरमन शहरातल्या बाजारपेठेत काल निमलष्करी शीघ्र कृती दलानं केलेल्या बॉम्बहल्ल्यात 54 नागरीक ठार झाले तर दीडशेहून अधिक जखमी झाल्याचं वृत्त आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शीघ्र कृती दलाच्या नियंत्रणाखाली असलेल्या परिसरातून हा हल्ला झाला, तसंच त्यात ड्रोनचाही वापर करण्यात आला. सुदाममध्ये सुरू असलेल्या यादवीतून हा हल्ला झाला आहे.