August 6, 2026 5:19 PM
9
विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत गदारोळ
नीट पेपरफुटीप्रकरणी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या मुद्द्यांवरुन संसदेच आजही गदारोळ झाला. या गदारोळातच लोकसभेत कररचना आणि इतर कायदेसुधारणा विधेयक चर्चेविना मंजूर झालं. त्यानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत आज गोंधळातच वाणिज्य, उद्योग, तसंच रसायन आणि खते विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचे अहवाल सभागृहात मांडण्यात आले. त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज सव्वा ३ वाजेपर्यंत तहकूब झालं आहे.