September 26, 2024 7:25 PM

views 66

देशातले शेअर बाजार उच्चांकी पातळीवर बंद

देशातल्या शेअर बाजारांनी आजही विक्रमी पातळी गाठली. सेन्सेक्स सत्रादरम्यान ८६ हजारांच्या उंबरठ्यावर जाऊन आला. दिवसअखेर सेन्सेक्स ६६६ अंकांनी वधारून ८५ हजार ८३६ अंकांवर तर निफ्टी २१२ अंकांची वाढ नोंदवून २६ हजार २१६ अंकांवर बंद झाला. चीनने दिलेलं आर्थिक प्रोत्साहन पॅकेज, आशियाई निर्देशांकातली तेजी याचा परिणाम शेअर बाजारात झाला.