April 15, 2025 8:59 PM

views 70

शेअर बाजारात जोरदार तेजी

अमेरिकेनं अतिरीक्त आयात शुल्क लादण्याच्या निर्णयाला स्थगिती दिल्यामुळं आजही देशातले शेअर बाजार जोरदार तेजीत होते. सेन्सेक्स आज तब्बल १ हजार ५७८ अंकांनी वधारुन ७६ हजार ७३५ अंकांवर बंद झाला. निफ्टी ५०० अंकांची वाढ नोंदवून २३ हजार ३२९ अंकांवर बंद झाला. यामुळं गुंतवणूकदारांची मालमत्ता सुमारे ११ लाख कोटी रुपयांनी वाढली. गेल्या २ सत्रात सेन्सेक्स सुमारे २ हजार ९०० आणि निफ्टी १ हजार अंकांनी वधारला आहे. दोन्ही निर्देशांक सध्या १५ दिवसातल्या उच्चांकी पातळीवर आहेत.

April 8, 2025 8:59 PM

views 61

जगभरातल्या शेअर बाजारात जोरदार तेजी

जगभरातल्या बाजारातली तेजी आणि रिझर्व्ह बँकेकडून उद्या पाव टक्के व्याजदर कपातीची आशा यामुळे देशातल्या शेअर बाजारांनी काल झालेलं निम्मं नुकसान आज भरुन काढलं. तीन दिवसानंतर तेजीत बंद झालेला सेन्सेक्स आज १ हजार ८९ अंकांची वाढ नोंदवून ७४ हजार २२७ अंकांवर बंद झाला. निफ्टी पावणे ४०० अंकांच्या वाढीसह २२ हजार ५३६ अंकांवर स्थिरावला.  वित्तीय सेवा, ग्राहकोपयोगी वस्तू, माहिती तंत्रज्ञान, सरकारी कंपन्या, वाहन, बांधकाम उद्योग क्षेत्रातल्या कंपन्यांचे समभाग आज वधारले.  युरोपियन बाजार आज ३ टक्क्यांपर्यंत, जपानी...

April 7, 2025 1:32 PM

views 52

अमेरिकेच्या टॅरिफ धोरणांमुळे शेअर बाजारांमधे मोठी घसरण

भारतीय शेअर बाजारावर आज आठवड्याच्या सुरुवातीलाच तीव्र घसरण पाहायला मिळाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तीन हजारांपेक्षा जास्त अंकांनी घसरला असून निफ्टी १ हजारांहून अधिक अंकांनी घसरला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या टॅरिफ घोषणांमुळे व्यापार क्षेत्रात तयार झालेला ताण आणि अमेरिकेत मंदी येण्याच्या भीतीचा तीव्र परिणाम भारतीय शेअर बाजारांवर दिसत आहे.    सध्या सेन्सेक्स ३ हजार ३००पेक्षा जास्त अंकांनी घसरून ७२ हजार ६६ अंकांच्या आसपास व्यवहार करतो आहे. तर निफ्टीही १ ...

April 4, 2025 7:49 PM

views 72

डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्कवाढ धोरणामुळे शेअर बाजार कोसळले

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या भरमसाठ व्यापार टेरिफमुळे जागतिक मंदीच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी अमेरिकी शेअर बाजार कोसळला. २०२० च्या कोविड साथीनंतर ही एका दिवसातली सगळ्यात मोठी घसरण ठरली.  नॅसडॅक निर्देशांकामधे सहा टक्के घसरण झाली. या मंदीचे पडसाद आशियातल्या प्रमुख शेअर बाजारात उमटले. जपान, कोरियाच्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. युरोपातल्या जर्मनी, फ्रान्स आणि लंडन बाजारांच्या निर्देशांकातही घट झाली.   मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज ९३१ अंकाची घसरण झ...

April 1, 2025 7:49 PM

views 75

शेअर बाजारात मोठी घसरण

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भरमसाठ आयात शुल्क लादणार असल्याच्या शक्यतेनं नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स आज १ हजार ३९० अंकांनी घसरुन ७६ हजार २४ अंकांवर बंद झाला. निफ्टी ३५४ अंकांची घट नोंदवून २३ हजार १६६ अंकांवर स्थिरावला. तेल आणि नैसर्गिक वायू तसंच दूरसंचार क्षेत्र वगळता इतर सर्वच क्षेत्रातले समभाग आज घसरले. राज्यात रेडी रेकनर दर वाढल्याचा विपरीत परिणाम बांधकाम क्षेत्रातल्या कंपन्यांवर झाला.

March 24, 2025 7:39 PM

views 160

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे १,०७९ अंकांची वाढ

देशातल्या शेअर बाजारात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेली तेजी या आठवड्याच्या पहिल्या दिवशीही कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज १ हजार ७९ अंकांची तेजी नोंदवून ७७ हजार ९८४ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ३०८ अंकांची वाढ नोंदवत २३ हजार ६५८ अंकांवर स्थिरावला.    सत्रादरम्यान सेन्सेक्सनं ७८ हजारांची आणि निफ्टीनं २३ हजार ७०० ची पातळी ओलांडली होती. बँकांच्या समभागांमध्ये आज जोरदार वाढ दिसून आली. गेल्याच आठवड्यात या दोन्ही निर्देशाकांनी ४ वर्षातली आठवडाभरातली सर्वोत्तम...

March 14, 2025 3:33 PM

views 73

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी शेअर बाजारात उतरणार

येत्या २ वर्षात शेअर बाजारात नोंदणी करण्याचं महावितरण अर्थात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचं नियोजन आहे, अशी माहिती कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांनी दिली. वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच विधानसभेत याचे सूतोवाच केलं होते. येत्या ५ वर्षात नवीकरणीय ऊर्जा स्रोतांपासून मिळणाऱ्या वीजेचे एकूण वीज वितरणातलं प्रमाण १३ टक्क्यांवरुन ५२ टक्क्यांपर्यंत नेण्याचं नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली. 

March 2, 2025 7:50 PM

views 85

सेबीच्या माजी अध्यक्ष माधवी पुरी-बुच आणि इतर पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल

सेबीच्या माजी अध्यक्ष माधवी पुरी-बुच आणि इतर पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल करायचे आदेश मुंबईच्या विशेष भ्रष्टाराविरोधी न्यायालयानं न्यायालयानं दिले आहेत. शेअरबाजारात गैरव्यवहार, तसंच नियमांचं उल्लंघन केल्याचे आरोप त्यांच्यावर आहेत. या प्रकरणाची तपासणी न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्याचे, तसंच ३० दिवसांच्या आत तपासाचा अहवाल देण्याचे आदेशही न्यायालयानं दिले.    या पार्श्वभूमीवर सेबीनं स्पष्टीकरण दिलं आहे. ज्या अधिकाऱ्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करायचे आदेश न्यायालयानं दिले आहेत, ते अधिकारी त्या ...

February 14, 2025 7:16 PM

views 65

शेअर बाजारात घसरण कायम

शेअर बाजारात आज सलग आठव्या सत्रात घसरण कायम राहिली. बाजार बंद होताना सेन्सेक्स २०० अंकांनी घसरला आणि ७५ हजार ९३९ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १०२ अंकांनी घसरला आणि २२ हजार ९२९ अंकांवर बंद झाला.    तेल आणि वायू, फार्मा, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका, बांधकाम, ग्राहकोपयोगी वस्तू, आणि ऊर्जा क्षेत्रासह सर्वच क्षेत्रांचे समभाग आज घसरणीच्या दबावाखाली राहिले.    शेअर बाजारातल्या गेल्या ८ सत्रांमधल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांनी  तब्बल २५ लाख ३१ हजार कोटी रुपयांची संपत्ती गमाव...

January 31, 2025 7:05 PM

views 59

अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर देशातल्या शेअर बाजारात तेजी

उद्या सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर आज सलग चौथ्या दिवशीही भारतीय शेअर बाजारांमध्ये तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज ७४१ अंकांनी वधारला आणि ७७ हजार ५०१ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २५९ अंकांची वाढ नोंदवत २३ हजार ५०८ अंकांवर बंद झाला. गेल्या चार दिवसांमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये एकूण अनुक्रमे २ हजार १३४ आणि ६७९ अंकांची वाढ झाली.    उद्याचा अर्थसंकल्प हा विकासपूरक असेल, अशी आशा गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाल्याने ही वाढ झाल्याचं मत...