December 13, 2025 9:01 PM

views 104

स्टेट बँकेची मूळ व्याजदरात पाव टक्क्यांची कपात

स्टेट बँकेनं मूळ व्याजदरात पाव टक्क्यांची कपात केली आहे. यामुळं बँकेचा रेपो दराशी संलग्न व्याजदर ७ पूर्णांक ९ दशांश टक्के होईल. सोमवारपासून हे नवे दर लागू होतील. यामुळं गृह, वाहन आणि इतर कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे. तसंच मुदत ठेवींवरचे व्याज दरही कमी होतील. इंडियन ओव्हरसीज बँकेनंही रेपो संलग्न व्याजदर पाव टक्क्यांनी कमी केला आहे. रिझर्व्ह बँकेनं व्याजदर पाव टक्क्यांची कपात केल्यानंतर दोन्ही बँकांनी हा निर्णय घेतला आहे.

November 25, 2025 3:21 PM

views 157

नवीन कामगार कायद्यांमुळे बेरोजगारीत १.३ दशांश टक्केपर्यंत घट होईल- SBI

नवीन कामगार कायद्यांमुळे ७७ लाख अतिरिक्त रोजगार निर्माण होऊन बेरोजगारीत १ पूर्णांक ३ दशांश टक्क्यांपर्यंत घट होईल, असा अंदाज भारतीय स्टेट बँकेच्या एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. २१ नोव्हेंबरपासून लागू झालेल्या या कायद्यांमुळं संघटित कामगारांचं प्रमाण किमान १५ टक्क्यांनी वाढून सुमारे साडे ७५ टक्क्यांपर्यंत जाईल.   आजघडीला हे प्रमाण ६० पूर्णांक ४ दशांश टक्के असल्याचा अंदाज आहे. सध्या देशभरात असंघटित क्षेत्रातल्या कामगारांची संख्या सुमारे ४४ कोटी इतकी असून त्यापैकी जवळपास ३१ कोटी कामगारां...

January 4, 2025 1:40 PM

views 55

देशाच्या ग्रामीण भागातलं दारिद्र्याचं प्रमाण २०२३ – २४ या आर्थिक वर्षात ५ टक्क्यांपर्यंत खाली आल्याचा भारतीय स्टेट बँकेच्या अहवालात निष्कर्ष

देशाच्या ग्रामीण भागातलं दारिद्र्याचं प्रमाण २०२३-२४ या आर्थिक वर्षात जवळपास ५ टक्क्यांपर्यंत खाली आलं आहे. हे प्रमाण २०११-२०१२ या आर्थिक वर्षात जवळपास २७ टक्के इतकं होतं. भारतीय स्टेट बँकेच्या अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे. गेल्या १२ वर्षांमध्ये शहरी भागातलं दारिद्र्याचं प्रमाणही १३ पूर्णांक ७ शतांश टक्क्यांवरून ४ पूर्णांक ९ शतांश टक्क्यांवर आलं आहे. ग्राहकांच्या क्रयशक्तीत झालेली वाढ आणि सरकारच्या सकारात्मक धोरणांमुळे ग्रामीण भागातल्या दारिद्र्याच्या प्रमाणात ही मोठी घट झाल्याचं अहवालातून द...

December 4, 2024 2:21 PM

views 69

भारतीय स्टेट बँकेने आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त भारताच्या पॅरालिम्पिक विजेत्यांचा केला सन्मान

भारतीय स्टेट बँकेनं आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त काल मुंबईत पॅरिस २०२४ पॅरालिम्पिक स्पर्धेतल्या भारताच्या पॅरालिम्पिक विजेत्यांचा विशेष सन्मान केला. या कार्यक्रमात २९ पॅरालिम्पिक विजेत्यांना धनादेश प्रदान करून त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यात आला.