January 23, 2025 8:10 PM

views 62

एसटीची सर्व बसस्थानकं सुंदर करण्याचा प्रयत्न – मंत्री प्रताप सरनाईक

एसटी बसस्थानकांची स्वच्छता ही कर्मचारी आणि प्रवाशांची संयुक्त जबाबदारी असून, या अभियानाच्या माध्यमातून एसटीची सर्व बसस्थानकं सुंदर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज म्हणाले. मुंबईत कुर्ला नेहरूनगर बसस्थानकावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाचा प्रारंभ त्यांनी केला, त्यावेळी ते बोलत होते. या अभियानाच्या बोधचिन्हाचं अनावरणही यावेळी त्यांच्या हस्ते झालं.

July 20, 2024 11:17 AM

views 45

राज्यातल्या १९३ एसटी बसस्थानकांसाठी ६०० कोटी रुपयांचा निधी – पालकमंत्री उदय सामंत

राज्यातल्या १९३ एसटी बसस्थानकांसाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ६०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे, अशी माहिती उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिली. रत्नागिरी जिल्ह्यात पाली इथं तीन कोटी ३४ लाख रुपये खर्च करून नव्यानं उभारलेल्या एसटी बसस्थानकाचं लोकार्पण काल त्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.   'गडचिरोलीसारख्या नक्षलवादी जिल्ह्यामधल्या बसस्थानकांच्या सुशोभिकरणासाठी १० कोटी रुपये दिले असून, रत्नागिरी, जाकादेवी, पावस, लांजा, गणपतीप...