March 9, 2025 2:43 PM

views 53

श्रीलंकेत शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिराचं उद्घाटन

श्रीलंकेतल्या अविस्सवेल्ला इथं आज शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिराचं उद्घाटन आज झालं. मोठ्या संख्येनं भाविक यावेळी उपस्थित होते. भारताचे श्रीलंकेतले उच्चायुक्त संतोष झा, ग्लोबल शिर्डी साई फाउंडेशनचे सी. बी. सत्पथी आणि इतरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.   [video width="1280" height="720" mp4="https://www.newsonair.gov.in/wp-content/uploads/2025/03/fdfdf.mp4"][/video]

January 20, 2025 1:07 PM

views 43

भारत-श्रीलंका यांच्यात सामपूर सौर प्रकल्पासाठी ऊर्जेची किंमत निश्चित

भारत आणि श्रीलंका यांनी दोन्ही देशांमधील ऊर्जा सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी सामपूर सौर ऊर्जा प्रकल्पातील ऊर्जेसाठी प्रति युनिट किंमत निश्चित केली आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन आणि सिलोन इलेक्ट्रिसिटी बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमानं नुकतेच ५ पूर्णांक ९७ अमेरिकी सेंट प्रति किलोवॅट प्रती तास, अशी किंमत निश्चित करण्यात आली आहे, श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांनी काल एका जाहीर सभेत ही माहिती दिली. अक्षय ऊर्जा क्षेत्रात १३५मेगा वॅटचा हा प्रकल्प द्विपक्षीय ऊर्जा सहकार्यामध्ये भारताच्या ...

January 15, 2025 8:39 PM

views 44

श्रीलंकेच्या पोलीस स्टेशन्सना ८० सिंगल कॅब पुरवण्यासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात सामंजस्य करार

श्रीलंकेच्या उत्तर प्रांतातल्या पोलीस स्टेशन्सना ८० सिंगल कॅब पुरवण्यासाठी आज भारत आणि श्रीलंका यांच्यात सामंजस्य करार झाला. विकासातली भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी हा करार करण्यात आला असून त्यासाठी भारतानं ३० कोटी श्रीलंकन रुपयांचं अनुदान दिलं आहे.  भारताचे उच्चायुक्त संतोष झा आणि श्रीलंकेचे सार्वजनिक सुरक्षा सचिव डी डब्ल्यू आर बी सेनेविरात्ने यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. नागरिकांना अधिकाधिक सुरक्षा पुरवण्याबरोबरच कायदा अंमलबजावणीत सुधारणा करणं हे या कराराचं उद्दिष्ट आहे. भारताच्या सीमा जनत...

December 16, 2024 7:51 PM

views 42

भारत आणि श्रीलंका यांच्यात दुहेरी कर आकारणी आणि कर चोरीला प्रतिबंध करण्यासाठी करार

भारत आणि श्रीलंका यांच्यात आज दुहेरी कर आकारणी टाळण्यासाठी आणि कर चोरीला प्रतिबंध करण्यासाठी करार झाले. तसंच, श्रीलंकेच्या नागरी सेवा अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासंदर्भातले सामंजस्य करारही करण्यात आले. जाफना आणि ईस्टर्न युनिव्हर्सिटी या विद्यापाठांमधल्या प्रत्येकी १०० विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत अर्थसहाय्य देण्याची योजनाही यावेळी जाहीर करण्यात आली.    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा झाली, त्यानंतर हे करार करण...

December 16, 2024 10:10 AM

views 38

अर्थव्यवस्था, सुरक्षेमध्ये भारत-श्रीलंका भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी वचनबद्ध – श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष

केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबतची चर्चा यशस्वी झाल्याचं श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष दिस्सानायके यांनी म्हटलं आहे. भारत श्रीलंका आर्थिक सहकार्य वाढवणं, गुंतवणुकीच्या संधींना प्रोत्साहन देणं, क्षेत्रिय सुरक्षा मजबूज करणं आणि पर्यटन, उर्जा यासारख्या क्षेत्रांचं आधुनिकीकरण याविषयी प्रामुख्यानं चर्चा झाल्याचं दिस्सानायके यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. यामुळे दोन्ही देशांमधली भागीदारी सुदृढ कर...

November 28, 2024 10:58 AM

views 48

फेंगल चक्रीवादळचा श्रीलंकेला फटका

बंगालच्या उपसागरात नैऋत्य दिशेला निर्माण झालेल्या फेंगल या चक्रीवादळचा श्रीलंकेला फटका बसला असून, चक्रीवादळामुळे आतापर्यंत चार जण मृत्युमुखी पडले आहेत. चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या भागात श्रीलंकेची नौदल आणि हवाई दलाची पथके मदतकार्य करत आहेत.

November 22, 2024 3:10 PM

views 36

श्रीलंकेत सत्ताधारी पक्षातल्या २९ जणांची उपमंत्री म्हणून नियुक्ती

श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांनी सत्ताधारी पक्षातल्या २९ जणांची आज उपमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. गेल्या सोमवारी राष्ट्रपतींनी २१ कॅबिनेट मंत्र्यांना शपथ दिली होती. श्रीलंकेचं आताचं मंत्रिमंडळ गेल्या काही दशकातलं सर्वात लहान आकाराचं मंत्रिमंडळ आहे. आतापर्यंत शपथ घेतलेल्या मंत्र्यांमध्ये अनिल जयंथा फर्नांडो, हर्षना सुरियापेरूमा, नामल करुणारत्ने मोहम्मद मुनीर यांचा समावेश आहे. श्रीलंकेच्या संविधानानुसार जास्तीत जास्त ३० कॅबिनेट मंत्री आणि ४० उपमंत्र्यांचा समावेश मंत्रिमंडळात ...

November 18, 2024 2:52 PM

views 43

श्रीलंकेच्या प्रधानमंत्री म्हणून डॉ. हरिणी अमरसूर्य यांनी घेतली शपथ

श्रीलंकेच्या नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा शपथविधी आज राजधानी कोलंबो इथं अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांच्या उपस्थितीत झाला. प्रधानमंत्री म्हणून डॉ. हरिणी अमरसूर्य यांनी तसंच अन्य २१ जणांनी पदाची शपथ घेतली. 

November 17, 2024 2:34 PM

views 42

श्रीलंकेत उद्या राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांच्या उपस्थितीत नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार

श्रीलंकेत उद्या राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांच्या उपस्थितीत नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. राष्ट्रपतींकडून २३ सदस्यीय मंत्रीमंडळाची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. डॉ. हरिणी अमरसूर्या प्रधानमंत्री पदाचा तर विजिता हेराथ परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा कार्यभार स्विकारतील. संरक्षण आणि अर्थ मंत्रालयाचा कारभार राष्ट्रपती आपल्याकडेच राखून ठेवतील अशी शक्यता आहे.  

October 15, 2024 2:35 PM

views 59

अतिवृष्टीने बाधित झालेल्या श्रीलंकेत पावसाचा जोर ओसरेल, श्रीलंकेच्या हवामान विभागाचा अंदाज

अतिवृष्टीने बाधित झालेल्या श्रीलंकेत पावसाचा जोर ओसरेल असा अंदाज आहे. श्रीलंकेच्या हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात आग्नेय भागात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा पश्चिम वायव्य दिशेला सरकण्याची शक्यता असल्यामुळे हवामान काहीसे निवळेल. दरम्यान श्रीलंकेत पूरग्रस्तांसाठी राष्ट्राध्यक्ष अनुरा दिस्सानायके यांनी ५० मिलीयन श्रीलंकन रुपयांची मदत मंजूर केली आहे. खराब हवामानामुळे दीड लाख नागरिक संकटात आल्याचं श्रीलंकेच्या आपदा व्यवस्थापन केंद्राने म्हटलं आहे. दहा हजार आपदग्रस्तांनी देश...