May 5, 2025 8:01 PM

views 38

श्रीलंकेतल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान 

श्रीलंकेतल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान  होणार आहे. २८ महानगरपालिका, ३६ नगरपरिषद आणि २७४ प्रदेश सभांसाठी ही निवडणूक होणार आहे. यासाठी ७२ हजार उमेदवार रिंगणात उतरले आहेत. श्रीलंकन प्रमाण वेळेनुसार उद्या सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी साडे चार वाजेपर्यंत मतदान होईल. त्यानंतर उद्या संध्याकाळीच मतमोजणीला सुरुवात होईल.