April 29, 2025 10:31 AM

views 38

स्पेन आणि पोर्तुगालमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याने दैनंदिन जनजीवन विस्कळीत

स्पेन आणि पोर्तुगालमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित झाल्यानं काल  दैनंदिन जनजीवन विस्कळीत झालं  होतं. आज सकाळपासून हळूहळू वीजपुरवठा सुरळीत होत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानं विमानसेवा ठप्प झाली, सार्वजनिक वाहतूक आणि रुग्णालयातील सेवाही विस्कळीत झाल्या होत्या. मात्र, वीजपुरवठा खंडित होण्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.    या अनपेक्षितरीत्या उद्भवलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर स्पेनच्या गृह मंत्रालयानं राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली असून देशभरात 30 हजार पोलीस अधिकारी तैनात क...