December 31, 2024 3:27 PM

views 51

इसरोच्या स्पेडेक्स मोहिमेअंतर्गत अंतराळात जोडल्या जाणाऱ्या दोन उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं आपल्या स्पेडेक्स मोहीमेअंतर्गत काल श्रीहरीकोटा इथल्या उपग्रह प्रक्षेपक तळावरुन दोन उपग्रह अवकाशात सोडले. या मोहिमेअंतर्गत अंतराळात दोन उपग्रहांची जोडणी अर्थात डॉकिंग करण्यात येणार आहे. काल एसडीएक्स 01 आणि एसडीएक्स 02 हे दोन्ही उपग्रह पृथ्वीपासून काही अंतरावर आपापल्या कक्षांमध्ये स्थिरावले. येत्या काही दिवसात दोन्ही उपग्रहांमधलं अंतर कमी होईल आणि त्यानंतर डॉकिंगची प्रक्रिया सुरू होईल, असं इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितलं.   चांद्रयान मोहीम आ...

December 25, 2024 12:35 PM

views 45

इस्रोच्या स्पॅडेक्स मिशनची तयारी अंतिम टप्यात

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या स्पॅडेक्स मिशनची तयारी अंतिम टप्यात आली आहे. या मिशन अंतर्गत एकाचवेळी दोन उपग्रहांचं एकत्रित प्रक्षेपण करण्यात येणार आहे. येत्या 30 डिसेंबरला सोमवारी श्रीहरिकोटा इथून हे प्रक्षेपण होणार आहे. एकत्रित प्रक्षेपपणानंतर दोन्ही उपग्रह विभक्त झाल्यानंतर दोन वर्षांपर्यंत कार्यरत राहतील. अशाप्रकारचं मिशन राबवणारा भारत जगातला चौथा देश ठरेल.