November 14, 2025 2:56 PM

views 62

अंतराळात अडकलेले चिनी अंतराळवीर लवकरच पृथ्वीवर परतणार

अंतराळात अडकलेले तीन  चिनी अंतराळवीर लवकरच पृथ्वीवर परत येणार आहेत. चीनच्या सरकारी माध्यमांच्या माहितीनुसार, हे तीनही अंतराळवीर एप्रिलमध्ये तियांगोंग या अंतराळ स्थानकावर गेले होते आणि  येत्या 1 नोव्हेंबरला  पृथ्वीवर परत येणार होते. पण त्यांच्या शेनझोऊ-20 या अंतराळयानाला अंतराळातल्या  मलब्याच्या एका छोट्या तुकड्याची धडक बसल्याचा संशय निर्माण झाल्याने त्यांची परतीची योजना रद्द करण्यात आली होती.

June 27, 2025 11:00 AM

views 142

ॲक्सिओम फोर मोहिमेद्वारे शुभांशु शुक्ला यांच्या रूपानं पहिला भारतीय अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात दाखल

ॲक्सिओम फोर या मोहिमेअंतर्गत भारतीय वायू दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्यासह 4 अंतराळवीरांना घेऊन निघालेलं स्पेसएक्स ड्रॅगन हे अंतराळयान काल दुपारी 4 वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचलं. ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारे पहिले भारतीय ठरले आहेत. 1984 मध्ये राकेश शर्मा अंतराळात जाणारे पहिले भारतीय ठरले होते; त्यांच्यानंतर 41 वर्षांनी भारतीय अंतराळवीर अंतराळात पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारा पहिला भारतीय अंतराळवीर होण्याचा...

March 15, 2025 2:51 PM

views 54

सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी ‘ड्रॅगन अंतराळ यान’ रवाना

गेल्या एक वर्षापासून अंतराळात अडकलेले नासाचे वैज्ञानिक सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी ड्रॅगन अंतराळ यान घेऊन जाणारं फाल्कन ९ रॉकेट काल संध्याकाळी अंतराळात रवाना झालं. नासा आणि स्पेसएक्सच्या क्रू १० मिशन अंतर्गत हे यान काल अंतराळात निघालं.   सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर गेल्या वर्षी जून महिन्यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेले होेते, मात्र अंतराळ यानात तांत्रिक बिघाड झाल्यानं त्यांना परतता आलं नाही. त्यांना परत आणण्यासाठी नासा प्रयत्न करत आहे. सर्व काही ठरल्याप्रम...