December 1, 2025 1:32 PM

views 108

सोलापुरात रस्ते अपघातात ५ जणांचा मृत्यू

सोलापूर जिल्ह्यात बार्शी-लातूर महामार्गावर झालेल्या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. विवाह सोहळ्यानंतर नवदाम्पत्याला देवदर्शनासाठी तुळजापूरला घेऊन जाणारी कार आणि भरधाव ट्रक यांची धडक होऊन हा अपघात झाला. ही धडक इतकी जोरदार होती, की कार पुलावरून खाली जाऊन तीन ते चारवेळा पलटी झाली. अपघातात दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं.

November 9, 2025 7:14 PM

views 78

राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या सोलापूर जिल्हा शाखेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा

शिक्षक पात्रता परीक्षा-टीईटी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी, या आणि इतर मागण्यांसाठी, राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या सोलापूर जिल्हा शाखेनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. जिल्हा परिषद, आणि खासगी शाळांमधल्या २५ पेक्षा जास्त संघटनांचे हजारो शिक्षक, मोर्चात सामील झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी, शिक्षणसेवक पद रद्द करावं, शिक्षकांची ऑनलाईन कामं बंद करावी या मागण्याही संघटने...

October 5, 2025 3:39 PM

views 90

सोलापूर जिल्ह्यातल्या पुरग्रस्त गावात आरोग्य आणि स्वच्छता मोहीम

सोलापूर जिल्ह्यातल्या पुरग्रस्त 82 गावात आरोग्य आणि स्वच्छतेची व्यापक मोहीम, जिल्हा परिषद यंत्रणेनं हाती घेतली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी ही माहिती दिली आहे.   पहिल्या टप्यात 53 गावात ही मोहिम राबवण्यात आली आहे. या सर्व गावांमध्ये आरोग्य शिबिरं घेऊन नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आल्याचही  जंगम यांनी सांगितलं आहे. ग्राम स्तरावरील सर्व  यंत्रणांनी या आरोग्य मोहिमेत दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी असे निर्देशही  जंगम यांनी दिले आहेत.

September 19, 2025 7:18 PM

views 100

Seva Pakhwada: सालोपुरात नागरिकांनी योजनांचा लाभ घेण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

सोलापूर जिल्ह्यात सेवा पंधरवड्याच्या अंतर्गत नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे. या सेवा पंधरवड्यांतर्गत अनेक गावातली पाणंद, शिवार, शेतरस्ते, पायवाटांचा शोध घेऊन त्यांच्या नोंदी सातबाऱ्यावर करण्यात येतील. ज्या गावांना स्मशानभूमी नाहीत, तिथे त्या तयार करण्यात येतील. तसंच जिल्हा प्रशासनाकडे प्रलंबित असलेल्या विविध नोंदी या पंधरवड्यात घेतल्या जाणार आहेत.

July 20, 2025 7:05 PM

views 63

सोलापूरच्या डॉ. वाघचवरे भावंडांचे कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत जागतिक विक्रम

सोलापूरमधल्या डॉ. स्मिता झांजुर्णे, डॉ. सत्यजित वाघचवरे, आणि डॉ. अभिजीत वाघचवरे या भावंडांनी दक्षिण आफ्रिकेत झालेली कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा निर्धारित वेळेत पूर्ण करत जागतिक विक्रम रचला आहे. अल्टिमेट ह्यूमन रेस म्हणूनही ओळखली जाणारी ही मॅरेथॉन दक्षिण आफ्रिकेतल्या डर्बन आणि पीटर्मॅरीसबर्ग या शहराच्या दरम्यान १९२१ आयोजित केली जात आहे. या स्पर्धेला  जातं. असंख्य , अवघड अशा चढ-उतार असलेल्या टेकड्यांमधून बारा तासांच्या आत या स्पर्धेसाठीचं ९० किलोमीटर अंतर पूर्ण करावं लागतं.    या स्पर्धेत या तीघा...

May 19, 2025 10:21 AM

views 58

सोलापूर आग दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मदत जाहीर

सोलापुरमधल्या अक्कलकोट रस्त्यावरील औद्योगिक वसाहतीमधील सेंट्रल टेक्सटाईल मिल टॉवेल कारखान्याला काल शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अग्निशामक दलानं जवळपास पाच ते सहा तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली.   राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 2 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपये मदत देण्य...

March 17, 2025 4:02 PM

views 69

सोलापूर  परिसर महनगर पालिकेनं बर्ड फ्लू बाधित क्षेत्र म्हणून घोषित

सोलापूर जिल्ह्यात छत्रपती संभाजी तलाव आणि किल्ला परिसरात एका कावळा आणि बगळ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नमुना चाचणीत बर्ड फ्लू आढळल्यानंतर हा परिसर महनगर पालिकेनं बर्ड फ्लू बाधित क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे. तसंच बर्ड फ्लू संसर्ग प्रतिबंधासाठी सर्व विभागांनी दिलेल्या सूचनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.तसंच नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.    

January 29, 2025 9:37 AM

views 83

सोलापूरमध्ये जीबीएसचे ५ संशयित रुग्ण

सोलापूर जिल्ह्यात जीबीएस आजाराचे पाच संशयित आढळून आले आहेत. त्यापैकी चौघांवर उपचार सुरु असून, एकाचा मृत्यू झाला आहे. उपचार सुरू असलेले चार ही रुग्ण लातूर, निलंगा, तसंच अणदूर या ठिकाणचे आहेत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ही माहिती दिली. काल पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी, नागरिकांनी घाबरुन न जाता, आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचं पालन करुन योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन केलं.

January 15, 2025 7:21 PM

views 88

सोलापूर इथं गड्डा यात्रेत जनावरांचा बाजार

सोलापूर इथल्या गड्डा यात्रेत जनावराच्या बाजाराला सुरुवात झाली आहे. या बाजारात मुऱ्हा, म्हैसाणा म्हैस, खिलार खोंड, गाय, कालवड, गिर गाय होस्टन, जर्सी गाय विक्रीसाठी आणण्यात आली आहेत. पंढरपुरी म्हशीला कोल्हापूर,  बेळगाव, हुबळी, धारवाड इथल्या शेतकऱ्यांची तर मुऱ्हा म्हशीला तेलंगणा, आंध्रप्रदेशातल्या शेतकऱ्यांकडून मोठी मागणी आहे. बैलगाडी शर्यतीसाठी खिल्लार खोंडांना मोठी मागणी आहे. त्यामुळे खिल्लार खोंडाच्या किमती वाढल्या असून एका खोंडाची किंमत दीड ते दोन लाख रुपये आहे. 

January 14, 2025 3:21 PM

views 86

सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं प्रयागराज इथं निधन

सोलापूर महापालिकेचे माजी महापाैर महेश विष्णूपंत काेठे यांचं आज सकाळी उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. ते साठ वर्षांचे होते. कोठे प्रयागराज इथं कुंभमेळ्याला गेले होते. आज सकाळी स्नान करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. साेलापूर महापालिकेच्या राजकारणावर वर्चस्व असलेला नेता अशी महेश काेठे यांची ओळख हाेती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते असणाऱ्या महेश कोठे यांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली हाेती.