January 10, 2026 11:25 AM

views 96

सिक्कीममध्ये आइस हॉकी सुरू करण्याची योजना

सिक्कीममध्ये हिवाळी खेळ म्हणून आइस हॉकी सुरू करण्याची योजना आखण्यात आहे. पूर्व सिक्कीममधील ग्नाथंग व्हॅलीमध्ये नैसर्गिक आइस रिंक उभारण्याची तयारी सुरू आहे. ही सुविधा पुढील हिवाळ्यापर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. गंगटोकचे जिल्हाधिकारी तुषार निखारे, सिक्कीम माउंटनियरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कुन्झांग ग्यात्सो भुतिया यांनी सिक्कीम सरकारचा क्रीडा विभाग आणि आइस हॉकी असोसिएशन ऑफ इंडियाच्या समन्वयानं आइस हॉकी सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सिक्कीममधील हिवाळ्याच्या परिस्थितीत इतर हिमालयीन राज्...

September 12, 2025 2:58 PM

views 54

सिक्कीममध्ये दरड कोसळून ४ जणांचा मृत्यू

सिक्कीममध्ये काल रात्री गेझिंग जिल्ह्यात रिंबिक गावात दरड कोसळून ४ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर एक जण बेपत्ता झाला असून अन्य एक जखमी झाला आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातल्या तिघांचा समावेश आहे.

June 6, 2025 3:32 PM

views 83

सिक्कीममध्ये अडकलेल्या १७ पर्यटकांची सुखरुप सुटका

सिक्किममध्ये अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे अडकलेल्या पर्यटकांना सुखरुप सोडवण्याचं काम प्रगतीपथावर आहे. चातेन भागातून १७ पर्यटकांना एम आय टू हेलिकॉप्टरनं पाक्योंगच्या ग्रीनफील्ड विमानतळावर उतरवण्यात आलं. इतर पर्यटकांची सुटका करण्यासाठी हेलिकॉप्टर कार्यरत असून विमानतळावर वैद्यकीय पथक तैनात करण्यात आलं आहे.  

June 2, 2025 1:36 PM

views 84

सिक्किममध्ये भूस्खलनामुळे दीड हजार पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश

सिक्कीमच्या लाचुंगमधून १ हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर पर्यटकांना सुरक्षितपणे हलवण्यात आलं आहे. २९मेला झालेल्या ढगफुटी आणि धुवांधार पावसामुळे पर्यटक अडकले होते. लाचेन, लाचुंग, गुरुडोंगमार, फूल व्हॅली आणि झिरो पॉइंटसारख्या ठिकाणांचं मोठ नुकसान झालं आहे. भूस्खलन आणि पूल कोसळण्यामुळे डिकचु-संकलांग-शिपग्येर, चुंगथांग-लाचेन-जीमा आणि चुंगथांग-लाचुङ रस्ते बंद आहेत. लाचेनच्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत.

April 26, 2025 10:36 AM

views 84

सिक्कीममधील गंगटोक इथं आज ईशान्येकडील ऊर्जामंत्र्यांची परिषद

सिक्कीममधील गंगटोक इथं आज ईशान्येकडील ऊर्जामंत्र्यांची परिषद होत आहे. केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल या परिषदेत सहभागी होणार आहेत.   ईशान्येकडील राज्यांचे सर्व ऊर्जामंत्री आणि वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. परिषदेत या भागातील वीज क्षेत्रातील विविध पैलूंवर चर्चा होणार आहे.

June 16, 2024 8:39 PM

views 69

सिक्किममध्ये मुसळधार पावसामुळे अडकलेल्या बाराशे पर्यटकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु

सिक्किममध्ये मुसळधार पावसामुळे आणि दरड कोसळल्याने अडकलेल्या बाराशे पर्यटकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु असून, मंत्री शेरिंग भुतिया स्वतः रस्ते आणि हवाई मार्गाने पर्यटकांच्या बचावकार्यावर लक्ष ठेवून आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विविध विभाग तसंच स्थानिक रहिवाशांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे.   मुख्यमंत्री प्रेसिंग तमांग यांनी मेल्लीबाजारला भेट देऊन पुरामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. तसंच पाटबंधारे विभागाशी प्रतिबंधात्मक उपायांबाबत चर्चाही केली. पावसाळ्यानंतर कायमस्वरुपी प...

June 14, 2024 2:31 PM

views 82

सिक्किमच्या मुख्यमंत्र्यांनी सोरेंग चाकुंग मतदारसंघाच्या आमदारकीचा दिला राजीनामा

सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंग तमांग यांनी सोरेंग चाकुंग मतदारसंघाच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोन मतदारसंघात विजयी झाल्यामुळे त्यांनी हा राजीनामा दिला आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार दोन मतदार संघात विजयी झालेल्या उमेदवाराला निकाल लागल्यापासून १४ दिवसांच्या आत एका मतदारसंघाचा राजीनामा द्यावा लागतो.