December 13, 2025 8:45 PM

views 50

माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लातूर शहराजवळच्या वरवंटी इथं त्यांच्या शेतात लिंगायत समाजाच्या परंपरेनुसार त्यांचा दफनविधी करण्यात आला. यावेळी पोलीस दलानं हवेत फैरी झाडून चाकुरकर यांना मानवंदना दिली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार अशोक चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, यांच्यासह सर्वपक्षांचे नेते आणि विविध क्षेत्रांतले मान्यवर यावेळी उपस्थित ह...