January 8, 2026 6:47 PM

views 122

शेअर बाजारात घसरण

अमेरिकेकडून पुन्हा अतिरीक्त आयात शुल्क लादले जाईल, या भीतीनं देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार घसरण झाली. दिवसअखेर सेन्सेक्स ७८० अंकांनी घसरुन ८४ हजार १८१ अंकांवर बंद झाला.   निफ्टी २६४ अंकांची घसरण नोंदवून २६ हजारांच्या खाली जाऊन २५ हजार ८७७ अंकांवर स्थिरावला. धातू, तेल आणि नैसर्गिक वायू यासारख्या क्षेत्रातल्या कंपन्यांचे समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले.

April 23, 2025 7:33 PM

views 78

शेअर बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे आज दिवसअखेर ५२१ अंकांची वाढ झाली, आणि तो  ८० हजार ११६ अंकांवर बंद झाला. सुमारे ४ महिन्यानंतर हा निर्देशांक पुन्हा ८० हजारांच्या पलीकडे गेला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १६२  अंकांची वाढ नोंदवत  २४ हजार ३२९ अंकांवर बंद झाला.    सोनं आज तोळ्यामागे अडीच हजार रुपयांनी स्वस्त झालं. मुंबईत आज २४ कॅरेट सोन्याचे दर सुमारे ९९ हजार रुपये तोळा झाले होते. तर २२ कॅरेट सोनं ९६ हजार ६०० रुपयांच्या आसपास मिळत होत. चांदी आज किलोमागे १ हजार रुपयांनी महाग झाली आणि ९...

April 4, 2025 10:25 AM

views 77

अमेरिकी शेअर बाजारांमध्ये जोरदार घसरण

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापारी भागीदारी देशांमधून होणाऱ्या आयातीवर भरमसाठ कर लागू केल्यामुळे अमेरिकी शेअर बाजारांमध्ये जोरदार घसरण होऊन ते दोन वर्षातील नीचांकी पातळीवर आले.अमेरिकी रोखे बाजारांनी दुपारपर्यंत २ पूर्णांक सात लाख कोटी डॉलर्स बाजार भांडवल गमावल्याचं वॉल स्ट्रीटच्या बातमीत म्हटलं आहे.   डाऊ इंडस्ट्रियल्स बाजार निर्देशांकात १३ शे अंकांची घसरण झाली तर नॅसडॅक ६ टक्क्यांनी कोसळला तर डाऊ जोन्स दिवसअखेरीस जवळपास ४ टक्क्यांनी घसरला.तत्पूर्वी दिवसाच्या सुरुवातीला आशियापा...

January 27, 2025 7:06 PM

views 72

शेअर बाजारात पुन्हा मोठी घसरण

जागतिक परिस्थितीमुळे देशातल्या शेअर बाजारात आज पुन्हा मोठी घसरण झाली. त्यामुळे सेन्सेक्सनं ७६ हजार आणि निफ्टीनं २३ हजारांच्या महत्त्वाच्या पातळीखाली बंद झाले. दिवसअखेर सेन्सेक्स ८२४ अंकांनी घसरुन ७५ हजार ३६६ अंकांवर बंद झाला. निफ्टी २६३ अंकांनी कोसळून २२ हजार ८२९ अंकांवर बंद झाला. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका वगळता इतर सर्वच क्षेत्रातले समभाग घसरले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोलंबियावर लादलेल्या निर्बंधांमुळे देशातले शेअर बाजार कोसळले.

January 10, 2025 7:45 PM

views 57

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे २४१ अंकाची घसरण

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे आज २४१ अंकाची घसरण झाली आणि तो ७७ हजार ३७९ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ९५ अंकांची घट नोंदवत २३ हजार ४३२ अंकांवर बंद झाला.

November 25, 2024 7:19 PM

views 68

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं पुन्हा ८० हजारांचा टप्पा ओलांडला

शेअर बाजार आज मोठ्या वाढीने बंद झाला. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज पुन्हा ८० हजारांचा टप्पा ओलांडला. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ९९३ अंकांची वाढ झाली आणि तो ८० हजार ११० अंकावर  बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीही ३१५ अंकांची वाढ नोंदवत २४ हजार २२२ अंकांवर बंद झाला. आज दिवसभराच्या व्यवहारात तेल आणि वायू, भांडवली वस्तू आणि औद्योगिक क्षेत्रातील समभागांची सर्वाधिक खरेदी झाली.

August 9, 2024 1:23 PM

views 67

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या गुंतवणूकदारांच्या संख्येत पहिल्यांदाच १० कोटींचा टप्पा पार

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या विशिष्ट नोंदणीकृत गुंतवणूकदारांच्या संख्येनं पहिल्यांदाच १० कोटींचा टप्पा पार केला आहे. मार्च २०२१ मध्ये नोंदणीकृत गुंतवणूकदारांची संख्या ४ कोटीवर पोहोचली होती. हा आकडा गाठण्यासाठी २५ वर्षांचा काळ लागला होता. मात्र, त्यानंतर सुमारे  ६ ते ७ महिन्यात पुढचे १ कोटी नोंदणीकृत गुंतवणूकदार जोडले गेले होते.   तर, केवळ ५ महिन्यात गुंतवणूकदाराची संख्या ९ कोटीवरून १० कोटीवर पोहोचल्याचं, एन एस ई नं एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. डिजिटायझेशन, आर्थिक समावेशन आणि गुंतवणूकदारांच...

August 2, 2024 2:26 PM

views 87

शेअर बाजारात घसरण

आज सकाळच्या सत्रात शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६४० अंकांनी घसरून ८१ हजार २२७वर आला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी काल २५ हजारांचा उच्चांक गाठल्यानंतर आज ५० अंकांनी घसरत २४ हजार ७४०वर आला. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ८३ रुपये ७३ पैशांवर आला आहे.