February 22, 2025 8:13 PM

views 58

शक्तीकांत दास यांची प्रधानमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तीकांत दास यांची प्रधानमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दास हे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. शक्तिकांत दास हे प्रधानमंत्र्यांचे दुसरे प्रधान सचिव असतील. त्यांच्या नियुक्तीला मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मान्यता दिली होती. दास हे तामिळनाडू कॅडरचे १९८० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. 

June 26, 2024 10:07 AM

views 65

देशाच्या आर्थिक विकासाची 8 टक्के वृद्धी दराच्या दिशेने वाटचाल

भारत आर्थिक विकासाच्या संदर्भात महत्वपूर्ण संरचनात्मक बदलाच्या उंबरठ्यावर असून सातत्यपूर्ण पद्धतीने 8 टक्के वृद्धी दराच्या दिशेने वाटचाल करत आहे. असं रिजर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटले आहे. मुंबईत काल बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या 188 व्या वार्षिक सभेला संबोधित करताना ते बोलत होते. भारताची विकास गाथा ही बहु-क्षेत्रीय आहे आणि पुढेही राहील. यामध्ये वस्तू आणि सेवा कर अग्रस्थानी असलेल्या विविध संरचनात्मक सुधारणांचं महत्वाचं योगदान आहे असं ते म्हणाले. इतर अनेक देशांच्या तुलन...