January 13, 2026 7:42 PM

views 48

जम्मू-काश्मिरमधलं शक्सम खोरं भारताचंच – लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी

जम्मू-काश्मिरमधलं शक्सम खोरं हे भारताचंच असल्याचा पुनरुच्चार लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केला आहे. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. यासंदर्भात १९६३ मध्ये चीन आणि पाकिस्तान यांच्यात झालेला करार अवैध असल्याची भूमिका त्यांनी मांडली. चीननं या खोऱ्यावर दावा केला होता. त्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला द्विवेदी उत्तर देत होते.