November 29, 2025 5:00 PM

views 382

ठाण्यात सेक्स रॅकेट उध्वस्त, पोलिसांची कारवाई

ठाणे पोलीसांनी केलेल्या कारवाईत एक सेक्स रॅकेट उध्वस्त केले. या प्रकरणी थायलंडची नागरिक असलेल्या एका महिलेला अटक केली आहे, तर थायलंडच्याच नागरिक असलेल्या दोन महिलांची सुटका केली गेली अशी माहिती कासारवडवली पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिली.    अटक केलेली महिला वेश्याव्यवसायासाठी परदेशी नागरिकांचा पुरवठा करत असल्याची माहिती मिळाली होती, त्याआधारे ही कारवाई केली. अटक केलेल्या महिलेचा आणि सुटका केलेल्या पीडितांच्या व्हिसाची मुदत संपलेली होती, असं पोलिसांनी सांगितलं.    अटक केलेल्या महिलेवि...