September 19, 2025 7:29 PM

views 97

Seva Pakhwada: सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘शाळा तिथे दाखला’ उपक्रम

सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनामार्फत 'शाळा तिथे दाखला'  उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना लागणाऱ्या दाखल्यांसाठी महसूल विभाग शाळेतून अर्ज भरुन घेतल्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करुन दोन ते चार दिवसात दाखले वितरीत करेल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.     सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त  सिंधुदुर्गाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पडतेवाडी इथल्या शाळेला भेट दिली.

September 19, 2025 7:18 PM

views 101

Seva Pakhwada: सालोपुरात नागरिकांनी योजनांचा लाभ घेण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

सोलापूर जिल्ह्यात सेवा पंधरवड्याच्या अंतर्गत नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे. या सेवा पंधरवड्यांतर्गत अनेक गावातली पाणंद, शिवार, शेतरस्ते, पायवाटांचा शोध घेऊन त्यांच्या नोंदी सातबाऱ्यावर करण्यात येतील. ज्या गावांना स्मशानभूमी नाहीत, तिथे त्या तयार करण्यात येतील. तसंच जिल्हा प्रशासनाकडे प्रलंबित असलेल्या विविध नोंदी या पंधरवड्यात घेतल्या जाणार आहेत.

September 19, 2025 7:14 PM

views 72

Seva Pakhwada: महिला सक्षमीकरणासाठी सरकार सकारात्मक

सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून चालताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देशाच्या सर्व समावेशक प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे. देशातल्या महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने उचललेल्या पावलांविषयी अधिक माहिती...   गेल्या ११ वर्षांत केंद्र सरकारने सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात महिलांना सक्षम करण्यासाठी व्यापक धोरण आखलं आहे. नारीशक्ती या अभियानामुळे महिलांना सन्मान, सुरक्षा आणि स्वावलंबन प्रदान केलं आहे. हिंसाचार तसंच लिंगाधारित भेदभावापासून घटनात्मक संरक्षण ते परिवर्त...

September 18, 2025 7:28 PM

views 83

Seva Parv: शेतीला तंत्रज्ञानाची जोड, शेतकऱ्यांच्या मेहनतीला नवा आयाम

सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून चालताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देशाच्या सर्व समावेशक प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे. सरकारने शेतीला तंत्रज्ञानाची जोड देत शेतकऱ्यांच्या मेहनतीला नवा आयाम दिला आहे. याविषयी अधिक माहिती... कृषी क्षेत्रात सरकारने सुरू केलेलं डिजिटल कृषी अभियान शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर अचूक परिणाम साधत आहे. उपग्रह, सेन्सर्स तसंच मोबाईल ॲप्लिकेशन यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीचं नियोजन, सिंचन पुरवठा आणि पीक संरक्षणाबाबत मार्गदर्शन मिळत आहे. ई-नाम...

September 18, 2025 4:02 PM

views 83

Seva Pakhwada: कृषी क्षेत्रात सुधारणा, उत्पन्नातही वाढ

सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून चालताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देशाच्या सर्व समावेशक प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे. सरकारच्या प्रयत्नांमुळे कृषी क्षेत्रात सुधारणा होत असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होत आहे.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील कृषी क्षेत्राचं क्षितिज आणखी विस्तारत आहे. शेतीपूरक विविध उद्योगांच्या माध्यमातून ग्रामीण कुटुंबांना उत्पन्नाचे नवे स्रोत उपलब्ध होत असून त्यांचं भविष्य सुरक्षित होण्यासाठी हे कृषी आधारित उद्योग...

September 17, 2025 8:37 PM

views 70

गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते दिल्लीसाठी १६०० कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन

सेवा पंधरवड्यांतर्गत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज दिल्लीसाठी १६०० कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. गेल्या ११ वर्षांत प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित झाला आहे. अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे आणि गरिबांपर्यंत सुविधा पोहोचल्या आहेत, असं शहा म्हणाले.    समाजाचं हित साधण्याच्या उद्देशानं सुरु करण्यात आलेल्या सेवापर्व मध्ये देशातल्या सर्व नागरिकांनी उत्साही सहभाग घ्यावा, असं आवाहन केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी केलं.  नड्डा यांच्या ह...

September 17, 2025 4:34 PM

views 71

Seva Pakhwada : उत्तर मुंबई मतदारसंघात विविध उपक्रमांचं आयोजन

सेवा पंधरवड्यामध्ये केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात विविध उपक्रमांचं आयोजन केलं आहे. त्यांची सुरुवातही आजपासून झाली. आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधांचा विकास यासारख्या विषयांवरचे ते उपक्रम आहेत. देशव्यापी स्वच्छता ही सेवा अभियानालाही आजपासून सुरुवात झाली आहे.

September 16, 2025 8:18 PM

views 80

Seva Pakhwada : आंतरराष्ट्रीय सौर आघाडीद्वारे भारताला सौर उर्जा क्षेत्रात महत्त्वाचं स्थान

सेवा आणि सुशासन या तत्वांचं अनुसरण करीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रसरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. हरित आणि स्वच्छ उर्जेच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय सौर आघाडीद्वारे भारताला सौर उर्जा क्षेत्रात महत्त्वाचं स्थान मिळण्यासाठी केलेल्या कामगिरीचा थोडक्यात आढावा…   हवामान बदलांवरच्या उपायांना पाठिंबा देण्यापासून ते हरित उर्जेपर्यंत भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा घडवून आणली आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये प्रधानमंत्री मोदी आणि फ्रान्सचे तत्कालीन अध्यक्ष फ्रँकोइस ओलांद यां...

September 16, 2025 3:06 PM

views 81

Seva Pakhwada : हवामान बदल आणि पर्यावरण रक्षणासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी

सेवा आणि सुशासन या तत्वांचं अनुसरण करीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रसरकारने अनेक लोकोपयोगी योजना राबवल्या आहेत. हवामान बदल आणि पर्यावरण रक्षणासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर  केलेल्या कामगिरीचा थोडक्यात आढावा…   जागतिक स्तरावर भारताने नेहमीच पर्यावरण रक्षणाची भूमिका घेतली आहे. गेल्या ११ वर्षांत वनसंवर्धन, हवामानविषयक न्याय्य भूमिका, सौर आणि हरित ऊर्जा या विषयांचा पुरस्कार करत शाश्वत विकासाला भारताने पाठिंबा दिला आहे. पॅरिसमधे झालेल्या कॉप ट्वेंटीवन परिषदेत 2030 पर्यंत स्...

September 15, 2025 8:17 PM

views 74

Satara : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स शासनाच्या योजनांचा प्रसार करण्याचं आवाहन

१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांनी आपल्या कल्पकतेमधून शासनाच्या विविध योजनांचा आपापल्या प्लॅटफार्मवरुन प्रसार करावा, असं आवाहन साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. नागरिक समाज माध्यमांकडे जास्त आकर्षीत झालेले दिसत असल्यानं दिलेल्या मजकूराचा अर्थ न बदलता नागरिकांना समजेल अशा भाषेत सोशल मीडियावर प्रसारित करावा.