August 12, 2024 3:23 PM

views 67

हिंडेनबर्गने केलेले आरोप सेबीने फेटाळले

हिंडेनबर्ग रिसर्चने केलेले आरोप सेबी म्हणजे भारतीय रोखे आणि विनिमय मंडळानं फेटाळले असून या पार्श्वभूमीवर शांत चित्ताने प्रतिक्रिया द्यावी,  असं आवाहन गुंतवणूकदारांना केलं आहे. हिंडेनबर्ग रिसर्चनं केलेल्या आरोपांचं खंडन केलं आहे. हितसंबंधांमुळे निर्माण होणारे पेचप्रसंग हाताळण्यासाठी सेबीकडे पुरेसे नियम आणि सक्षम अंतर्गत यंत्रणा असल्याचं सेबीने म्हटलं आहे. वैयक्तिक मालकीचे समभाग, आणि इतर मुद्द्यांवर सेबी अध्यक्षांनी वेळोवेळी जाहीर खुलासे केले असून, हितसंबंधांचा पेच उद्भवेल अशा प्रकरणांमधून नेहमीच ...

August 11, 2024 1:36 PM

views 45

अमेरिकेतल्या हिंडेनबर्गकडून करण्यात आलेल्या आरोपांचे सेबीकडून खंडन

सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी अमेरिकेतल्या हिंडेनबर्ग या गुंतवणूक आणि संशोधन संस्थेनं केलेले आरोप फेटाळले आहेत. बुच दांपत्याचा अदानी समुहाशी संबंधित ऑफ-शोअर संस्थांमध्ये सहभाग असल्याचा आरोप हिंडनबर्गनं केला होता. यासंदर्भात धवल  बुच यांनी एक निवेदन जारी केलं असून, आपल्या उत्पनाविषयीची माहिती सार्वजनिक असल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भातली आवश्यक कागदपत्र याआधीच सेबीकडे जमा करण्यात आली असल्याचं त्या निवेदनात म्हटलं आहे. आपल्या आर्थिक कागदपत्रांसह  इतर दस्तऐवजांची चौकश...

July 25, 2024 10:38 AM

views 48

इक्विटी कॅश विभागातील वैयक्तिक इंट्रा-डे ट्रेडर्सपैकी 70 टक्क्यांहून अधिक ट्रेडर्सचं नुकसान झालं असल्याचं SEBI चा अभ्यास

2022-23 या आर्थिक वर्षात इक्विटी कॅश विभागातील वैयक्तिक इंट्रा-डे ट्रेडर्सपैकी 70 टक्क्यांहून अधिक ट्रेडर्सचं नुकसान झालं असल्याचं SEBI ने केलेल्या एका अभ्यासात आढळून आलं आहे. एकाच दिवसात समभागांची खरेदी आणि विक्री करणे याला इंट्रा-डे ट्रेडींग म्हणतात. आर्थिक वर्ष 2018-19 च्या तुलनेत 2022-23 या आर्थिक वर्षात इक्विटी कॅश विभागामध्ये इंट्रा-डे ट्रेडिंगमध्ये भाग घेणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत 300 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचंही या अभ्यासात नमूद करण्यात आलं आहे. अहवालानुसार, इक्विटी कॅश विभागामध्ये व...