February 17, 2025 9:04 PM

views 67

SBI Mutual Fund: २५० रुपये गुंतवता येतील अशी SIP सुरु

एसबीआय म्युच्युअल फंडने आज अवघे २५० रुपये गुंतवता येतील, अशा SIP ला सुरुवात केली. सर्व महत्त्वाच्या गुंतवणूक व्यासपीठांच्या आधारे SBI म्युच्युअल फंडाच्या विविध योजनात किमान अडीचशे रुपये  SIP द्वारे गुंतवता येतील. याचा फायदा नवीन गुंतवणूदार, असंघटित क्षेत्रातले कामगार तसंच छोट्या बचतीसाठी इच्छुक असणाऱ्यांना होईल, अशी आशा कंपनीला आहे.