January 2, 2026 7:37 PM

views 3.6K

९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं साताऱ्यात औपचारिक उद्घाटन

मराठी भाषा आणि जाती धर्म यांची सरमिसळ न करण्याचं आवाहन संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांनी आज केलं. ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या औपचारिक उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.    सातारा येथील शाहू स्टेडियममध्ये ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आज उद्घाटन झालं. संमेलनाच्या अध्यक्ष पदाची सूत्रं ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी मावळत्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांच्याकडून स्वीकारली.    ज्येष्ठ हिंदी साहित्यिक डॉ. मृदुला गर्ग प्रमुख पाहुण्या होत्या. सर्वात पहिल्‍यांदा ...

June 30, 2025 3:57 PM

views 94

उरमोडी नदीत १५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग

सातारा जिल्ह्यातल्या उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढली असून पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज  धरणाच्या  वक्र दरवाजातून उरमोडी नदीत १५०० क्युसेक पाणी सोडण्यात येत  आहे. जलविद्युत प्रकल्पातून या पूर्वीच सुरू असलेला ५०० क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरूच आहे. त्यामुळे सांडवा आणि जलविद्युत प्रकल्प असा एकूण दोन हजार क्युसेक विसर्ग नदी पात्रात होणार आहे.   वाशीम जिल्ह्यात गेल्या आठवड्यात दोन दिवसांत सरासरी १४४.३ मि.मी. पाऊस झाला. यामध्ये जवळ...

March 20, 2025 3:01 PM

views 72

साताऱ्यात पारंपरिक बगाड यात्रेचा उत्साह

सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातल्या बावधन मध्ये काल पारंपरिक बगाड यात्रा पार पडली. भैरवनाथाच्या जयघोषात हजारो भाविकांनी गुलाल उधळत बगाड रथ यात्रेत भाग घेतला. या यात्रेसाठी राज्यभरातून अनेक भाविक आले होते. दर वर्षी रंगपंचमीच्या दिवशी ही बगाड यात्रा होत असते. यावेळे भैरवनाथाला अनेक नवस बोलले जातात. तब्बल ४५ फूट उंचीच्या लाकडी बगाडवर मानाच्या बगाड्याला एका हुकने लटकवले जाते. यंदा बगाड्या होण्याचा मान अजित ननावरे यांना मिळाला होता.

December 8, 2024 3:23 PM

views 73

निवडणूक आयुक्‍त निवडण्‍याच्‍या प्रक्रियेत फेरफार – पृथ्वीराज चव्हाण

राज्यघटनेतल्या तरतुदींनुसार निवडणूक आयोग स्‍वायत्त संस्‍था आहे, मात्र निवडणूक आयुक्‍त निवडण्‍याच्‍या प्रक्रियेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फेरफार केले. अप्रत्‍यक्षपणे सरकारच आयुक्तांची नेमणूक करीत असून त्यामुळे आयोग सरकारला अपेक्षितच काम करतो, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. साताऱ्याच्या काँग्रेस भवनमध्‍ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.   निवडणूक आयोगाची स्‍वायत्तता धोक्‍यात आली असून, त्‍याची कार्यपध्‍दती आता सरकारी खात्‍याप्रमाणेच झाली आहे असं ते म्हणाले....

October 3, 2024 9:13 AM

views 69

शेतकऱ्यांच्या विकासामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं योगदान मोठं – उपमुख्यमंत्री अजित पवार

सहकार हा विकासाचा पाया असून शेतकऱ्यांच्या विकासामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचं योगदान मोठं असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बँकेच्या अमृत महोत्सवी वर्ष सांगता कार्यक्रमात बोलताना सांगितलं. साखर कारखान्यांच्या एफआरपीप्रमाणे साखरेची एमएसपीही वाढविण्याचं आश्वासन केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी दिल्यामुळं ऊसाला चांगला दर देणं शक्य होणार असल्याचंही पवार यावेळी म्हणाले.

September 22, 2024 6:44 PM

views 61

‘शिक्षणाची संधी मिळालेल्या समाजघटकांना आधुनिक तंत्रज्ञानापासून दूर ठेवता येणार नाही’

दीर्घ काळ वंचित राहिल्यानंतर शिक्षणाची संधी मिळालेल्या समाजघटकांना आधुनिक तंत्रज्ञानापासून दूर ठेवता येणार नाही, असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज साताऱ्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.    शिक्षणक्षेत्रात प्रचंड बदल झालेत. आधुनिकता आली, तंत्रज्ञान आलं. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगात मोठ्या प्रमाणात बदल होताना आपल्याला दिसत आहेत. ज्यांच्यासाठी अण्णांनी काम केलं, त्यांना या आधुनिक तंत्रज्ञानापासून दूर ठेवता येणार नाही. त्...

August 19, 2024 11:04 AM

views 51

सातारा जिल्ह्यात राज्यातल्या पहिल्या सौरग्रामचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

सातारा जिल्हयात पाटण तालुक्यातल्या मान्याचीवाडी या राज्यातल्या पहिल्या सौरग्रामचं लोकार्पण काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. या गावात महावितरणच्या वतीने शंभर टक्के सौर ऊर्जीकरण करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज, मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना, मागेल त्यांना सौर कृषीपंप योजना, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकरी आणि घरगुती वीजग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

June 27, 2024 9:43 AM

views 66

सातारा जिल्ह्यातील नद्यांजवळील शेतकऱ्यांनी सिंचन पंप सुरक्षित स्थळी हलवण्याचे कोयना सिंचन विभागाचे आदेश

सातारा जिल्ह्यातल्या कोयना, तारळी, उत्तरमांड, वांग, उत्तरवांग नआद्या तसंच या नद्यांवरचे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि महिर, चाफळ आणि चाळकेवाडी तलाव इत्यादी ठिकाणी पुरामुळं शेतकऱ्यांच्या सिंचन पंपांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणचे उपसा सिंचन योजना पंप शेतकऱ्यांनी तात्पुरत्या स्वरुपात स्वखर्चानं सुरक्षित स्थळी हलवावे. पुरामुळं पंपाचं नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शेतकऱ्यांची राहील, असं कोयना सिंचन विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी कळवलं आहे.