May 13, 2025 2:58 PM

views 30

भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना निवृत्त

भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना आज निवृत्त होत आहेत. १० नोव्हेंबर २०२४ ला त्यांनी पदभार स्वीकारला होता. निवृत्तीनंतर आपण कोणतंही लाभाचं पद स्वीकारणार नाही असं खन्ना यांनी स्पष्ट केलं असून कायद्याच्या क्षेत्रात कार्यरत राहण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.   खन्ना यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांची शिफारस केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याला मान्यता दिल्यानंतर गवई सरन्यायाधीपदाची शपथ घेतली. 

February 15, 2025 2:26 PM

views 42

कायद्याची अक्षर ओळख करून घेण्याऐवजी कायद्यामागचा इतिहास समजून घेणं आवश्यक – संजीव खन्ना

विधी विद्यापीठातून केवळ कायद्याची अक्षर ओळख करून घेण्याऐवजी कायद्यामागची  भूमिका,  इतिहास , कायद्याचा व्यावहारिक उपयोग आणि  अंमलबजावणी समजून घेणं आवश्यक असतं, असं प्रतिपादन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी आज केलं.   नागपूरच्या  वारंगा इथल्या  महाराष्ट्र राष्ट्रीय  विधी  विद्यापीठ-नागपूर, चा तिसरा दीक्षांत समारंभ आज झाला, त्यावेळी मुख्य अतिथी म्हणून ते संबोधित करत होते. या समारंभात, एकूण १५५ पदवीधरांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. ज्यामध्ये ११२ पदवीपूर्व  पदव्या, २८ पदव्युत्तर पदव्या आणि १५ पी...