October 16, 2025 2:35 PM

views 76

राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढविण्यावर भर द्यायला हवा- परराष्ट्र मंत्री

 दहशतवाद, आर्थिक अस्थिरता आणि हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढविण्यावर भर द्यायला हवा, असं परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे.   संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेत सहकार्य करणाऱ्या सैन्यदल प्रमुखांच्या परिषदेला नवी दिल्लीत संबोधित करत होते.  संरक्षणात्मक उपकरणे, सायबर क्षमता आणि सर्वोच्च दर्जाच्या मोहिमेच्या तयारीमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी  सांगितलं.

August 19, 2025 11:14 AM

views 50

बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेसाठी भारताची आग्रही भूमिका – परराष्ट्र व्यवहार मंत्री

सध्याच्या आंतरराष्ट्रीय वातावरणात जागतिक अर्थव्यवस्थेत स्थैर्य राखणं आणि ते आणखी वाढवणं आवश्यक झालं असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. भारत समन्यायी, संतुलित आणि बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेसाठी आग्रही असल्याचं स्पष्ट करत सुधारित बहुपक्षवाद ही काळाची गरज असल्याचं डॉ. जयशंकर यांनी नमूद केलं.   सध्या भारत दौऱ्यावर असलेले चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी डॉ. जयशंकर यांनी चर्चा केली, त्यावेळी सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्धच्या लढ्याला भारताचं सर्वोच्च प्राधान्...

August 16, 2025 8:17 PM

views 64

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री चो ह्युन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आज दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री चो ह्युन यांच्यासोबत नवी दिल्लीत द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये व्यापार, उत्पादन, सागरी क्षेत्र, लोकांमध्ये होणारा संवाद या क्षेत्रात द्विपक्षीय सह   कार्य वाढवण्याबाबत फलदायी चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी समाज माध्यमावर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर, ऊर्जा आणि संरक्षण यासारख्या क्षेत्रांमध्ये नवीन संधींबाबत चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी हिंद- ...

July 16, 2025 9:57 AM

views 56

शांघाय सहकार्य संघटनेनं अतिरेकीवादाच्या मुद्द्यांवर तडजोड न करता कठोर भूमिका घ्यावी – परराष्ट्र मंत्री

शांघाय सहकार्य संघटनेनं अर्थात एससीओनं दहशतवाद, फुटीरतावाद आणि अतिरेकीवादाच्या मुद्द्यांवर तडजोड न करता कठोर भूमिका घ्यावी, असं आवाहन भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी काल चीनमधील तियानजिन इथं झालेल्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत केलं. पहलगाममधील दहशतवादी हल्ला धार्मिक फूट पाडण्याच्या उद्देशानं जम्मू आणि काश्मीरची पर्यटन अर्थव्यवस्था कमकुवत करण्यासाठी करण्यात आला.   संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं या घटनेचा निषेध केला असून, या निंदनीय कृत्याचे गुन्हेगार, वित्तपुरवठादा...

July 15, 2025 1:10 PM

views 57

परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्यांची घेतली भेट

परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी आज बीजिंगमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष  शी जिनपिंग आणि एससीओ, अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या इतर सदस्यांची  भेट घेतली. डॉ. जयशंकर आपल्या  दोन दिवसांच्या चीन दौऱ्यासाठी काल बीजिंग मध्ये  पोहोचले.   ते आज तियानजिन शहरात होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहतील. डॉ. जयशंकर यांनी काल बीजिंगमध्ये चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्या बरोबर द्विपक्षीय बैठक घेतली. चीनकडून हायड्रॉलिक डेटाची तरतूद पुन्हा करण्यासह, सीमापार ...

July 14, 2025 10:47 AM

views 52

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आजपासून दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आजपासून दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर रवाना होत आहेत. शांघाय सहकार्य संघटनेतील 10 सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या आज होणाऱ्या बैठकीला ते उपस्थित राहातील.   या बैठकीत विविध क्षेत्रातल्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. त्याशिवाय जयशंकर या देशांच्या नेत्यांशी द्वीपक्षीय बैठका घेतील. तसेच चीनचे समपदस्थ वांग यी यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे.

July 1, 2025 9:21 AM

views 77

परराष्ट्र व्यवहार मंत्री आज अमेरिकेत क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार

परराष्ट्र व्यवहार  मंत्री डॉ.एस.जयशंकर आज अमेरिकेत होणाऱ्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर विशेषतः हिंद-प्रशांत क्षेत्राशी संबंधित बाबींवर ते चर्चा  करतील.   या बैठकीचं  यजमानपद अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो हे भूषवणार  असून यावेळी ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वोंग आणि जपानचे परराष्ट्र मंत्री इवाया ताकेशी देखील उपस्थित राहणार  आहेत.

May 19, 2025 11:27 AM

views 44

परराष्ट्र व्यवहार मंत्री सहा दिवसांच्या युरोप दौऱ्यावर

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर आज सहा दिवसांच्या युरोप दौऱ्यावर रवाना होतील. या दौऱ्यात ते नेदरलँडस, डेन्मार्क आणि जर्मनीला भेट देऊन तिथल्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. यामध्ये परस्पर हिताच्या क्षेत्रिय आणि जागतिक मुद्द्यांवरदेखील चर्चा होईल.

May 17, 2025 9:12 PM

views 48

अमेरिकेसोबत व्यापाराला अंतिम स्वरूप मिळायला वेळ लागेल – परराष्ट्रव्यवहार मंत्री

अमेरिकेबरोबर सध्या सुरु असलेल्या व्यापार विषयक वाटाघाटी गुंतागुंतीच्या असून, त्याला अंतिम स्वरूप मिळायला वेळ लागेल, असं परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. भारतानं अमेरिकन वस्तूंवरचे सर्व कर रद्द करण्याची तयारी दर्शवल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीत केला होता, त्या पार्श्वभूमीवर जयशंकर यांनी  बातमीदारांशी बोलताना हे स्पष्ट केलं.   भारत-अमेरिका व्यापार करार दोन्ही देशांसाठी फायद्याचा आणि व्यवहार्य ठरायला हवा, असं ते यावेळी म्हणाले. सध्या कोणत्या...

May 1, 2025 8:33 PM

views 57

एस जयशंकर यांची चो ताई युल यांच्याशी पहलगाम हल्ल्याविषयी दूरध्वनीवरून चर्चा

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी दक्षिण कोरियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री चो ताई युल यांच्याशी पहलगाम दहशतावादी हल्ल्याविषयी दूरध्वनीवरून चर्चा केली. भारताच्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईला दक्षिण कोरियानं पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी चो ताई युल यांचे आभार मानले.