May 23, 2025 11:33 AM

views 38

अमेरिका आणि इराण यांच्यातील अप्रत्यक्ष चर्चेची पाचवी फेरी आज रोम इथं

अमेरिका आणि इराण यांच्यातील अप्रत्यक्ष चर्चेची पाचवी फेरी आज रोम इथं आयोजित करण्यात आली आहे. ओमानचे परराष्ट्र मंत्री सय्यद बद्र बिन हमद बिन हमूद अल्बुसैदी यांनी ही घोषणा केली. एप्रिलपासून आतापर्यंत झालेल्या चर्चेच्या चार फेऱ्यांपैकी तीन मस्कतमध्ये तर एक रोममध्ये पार पडल्या.   इराणचा अणुकार्यक्रम आणि अमेरिकेनं अद्यापही न हटविलेले निर्बंध यामुळे रेंगाळलेली राजनैतिक स्तरावरील बोलणी पुन्हा सुरू करण्याच्या उद्देशानं ओमाननं या चर्चेचं आयोजन केलं आहे.

February 23, 2025 6:57 PM

views 45

पोप फ्रान्सिस यांची प्रकृती सध्या स्थिर

पोप फ्रान्सिस हे प्रकृतीअस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती रोममधल्या स्थानिक वृत्तसंस्थांनी दिली आहे. पोप फ्रान्सिस यांना न्यूमोनियाचा संसर्ग झाला असून त्यांना रोमच्या जेमेली रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असली तरी त्यांना प्राणवायूचा सातत्याने पुरवठा केला जात आहे.