January 21, 2025 1:22 PM

views 26

प्रजासत्ताक दिन संचलनाची जोरदार तयारी सुरु

येत्या रविवारी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत कर्तव्य पथावर होणाऱ्या शानदार संचलनाच्या कार्यक्रमात भारताचं सांस्कृतिक वैभव आणि भारतीय सैन्य दलाचं कौशल्य याचं दर्शन घडणार आहे. त्यात सहभागी होणाऱ्या पथकांचा कसून सराव चालू आहे. हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्सनी आज हवाई कसरतीचा सराव केला.   भारतीय संविधानाला ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विशेष दोन चित्ररथ यंदाच्या संचलनात सहभागी होणार आहेत. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुब्रियांतो हे या संचलनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून...