July 23, 2025 2:45 PM

views 46

ज्येष्ठ रंगकर्मी, आणि राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे माजी संचालक रतन थिय्याम यांचं निधन

ज्येष्ठ रंगकर्मी रतन थिय्याम यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. मणिपूरमधे राहणारे थिय्याम इम्फाळ मधल्या रुग्णालयात गेले काही दिवस उपचार घेत होते. उपचारांदरम्यान आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.   नाटककार, दिग्दर्शक आणि  रंगमंचाला दिवाणखान्यातून बाहेर काढून मोकळ्यावर नेणाऱ्या थिएटर ऑफ रूट्स नाट्यचळवळीचे जनक म्हणून थिय्याम यांची ओळख होती.  भरतमुनींच्या नाट्यशास्त्राचा त्यांच्यावर प्रभाव होता. तांग ता या युद्धकलेचा आविष्कारही त्यांनी संस्कृत नाटककार भासाच्या उरुभंगम या म...