February 28, 2025 7:11 PM

views 33

रणजी करंडक : अंतिम सामन्यात केरळच्या पहिला डावात ३४२ धावा

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत, नागपूर इथं सुरु असलेल्या अंतिम सामन्यात आज तिसऱ्या दिवसअखेर केरळचा पहिला डाव ३४२ धावांवर संपला. त्यामुळे विदर्भाला पहिल्या डावात ३७ धावांची आघाडी मिळाली.    केरळचा आदित्य सरवटे आज ७९ धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार सचिन बेबीनं डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याचं शतक थोडक्यात हुकलं. तो ९८ धावांवर बाद झाला. इतर फलंदाज दीर्घ खेळी करु शकले नाहीत. विदर्भातर्फे दर्शन नळकांडे, हर्ष दुबे आणि पार्थ रेखाडे यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.

February 27, 2025 1:40 PM

views 27

रणजी करंडक : अंतिम सामन्यात विदर्भाच्या पहिल्या डावात ३७९ धावा

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतीम सामन्याच्या दुसऱ्या दिवशी विदर्भ संघाचा पहिला डाव ३७९ धावांवर आटोपला.    केरळच्या संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी उतरलेल्या विदर्भ संघाची सुरुवात अडखळत झाली. मात्र दानिश मालेवार यानं झुंझार शतकी खेळी करत संघाचा डाव सावरला.  केरळकडून ईडन  टॉम  आणि निधीश यांनी प्रत्येकी आणि नेदुमंकुझी बसील याने दोन गडी बाद केले.    या स्पर्धेच्या इतिहासात केरळनं पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीत केरळनं गुजरात विरोधात पहिल्...